modi with nepal pm 
ग्लोबल

चीन पाठोपाठ नेपाळचे फुत्कार, भारताची जमीन दाखवली आपल्या नकाशावर

सकाळ वृत्तसेवा

काठमांडू - नेपाळच्या संसदेने वादग्रस्त नकाशाच्या सुधारणेचा प्रस्ताव मंजुर केला आहे. नव्या नकाशामध्ये भारतातील तीन भाग नेपाळचे असल्याचं दाखवण्यात आलं आहे. यामध्ये कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा यांचा समावेश आहे. नेपाळच्या 275 पैकी 258 सदस्यांनी या प्रस्तावाच्या बाजुने मतदान केले. नेपाळ आणि भारत यांच्यातील या वादामुळे सीमेवरील वातावरण तणावाचे झाले आहे. 8 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी लिपुलेख ते धाराचूला पर्यंतच्या रस्त्याचे उद्घाटन केले होते. त्यानंतर नेपाळने लिपुलेख आपलं असल्याचा दावा केला होता. 

सीमावादाची ठिणगी तेव्हा पडली जेव्हा नेपाळने 18 मे रोजी नवीन नकाशा प्रसिद्ध केला. यामध्ये भारतातील तीन भाग असलेले लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी  हे आपले असल्याचा दावा नेपाळने केला होता. 

मंत्रिमंडळ बैठकीत भूमी संसाधन मंत्रालयाने नेपाळचा हा सुधारीत नकाशा जारी केला होता. बैठकीत उपस्थित असलेल्या मंत्रिमंडळ सदस्यांनी याला पाठिंबा दिला होता. त्यानंतर 18 मे रोजी नेपाळने नकाशा प्रसिद्ध केला होता. यानंतर भारत आणि नेपाळ यांच्यात तणावाचे वातावरण बनले. भारतातून नेपाळच्या या कृतीला कडक विरोध केला गेला. मात्र नेपाळने नकाशाबाबत आपण ठाम असल्याचेच सांगितलं. 

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी भारतावरच उलट आरोप केले होते. तसंच त्यांनी दावा केला होता की, 'आम्ही आमची जमीन परत घेऊ.' दरम्यान, 11 जूनला नेपाळच्या कॅबिनेटने 9 लोकांची एक समिती स्थापन केली. खरंतर नेपाळ सध्य़ा ज्यावर दावा करत आहे आणि भारतासोबत वाद निर्माण करत आहे त्या जमीनीवर अधिकार सांगण्यासाठी आवश्यक ते पुरावे नेपाळकडे नाहीत. 

नव्या नकाशाच्या प्रस्तावाला नेपाळमध्ये जनता समाजवादी पक्षाच्या खासदार सरिता गिरी यांनी विरोध दर्शवला आहे. त्यांनी हा प्रस्ताव मागे घ्या आणि पुन्हा जुना नकाशा जारी करण्याची मागणी केली होती. सरिती गिरी यांनी मांडलेला हा प्रस्ताव स्पीकर अग्नि प्रसाद सपकोटा यांनी फेटाळून लावला. जुन्या नकाशाबाबत प्रस्ताव मांडल्यानंतर सरिता गिरी यांच्या घरावरही हल्ला झाला. त्यांनी देश सोडून जावा अशी धमकीही लोकांनी दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT