kp oli sharma
kp oli sharma 
ग्लोबल

नेपाळमध्ये राजकीय संकट; पंतप्रधान ओली संसदेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी!

सकाळ डिजिटल टीम

काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली (KP Sharma Oli) संसदेच्या कनिष्ठ सभागृहात आपलं बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले आहेत. नेपाळमध्ये सोमवारी संसदेचं विशेष सत्र बोलावण्यात आलं होतं. पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड (Prachand) यांच्या नीत नेपाळ कम्युनिस्ट पार्टीनं ओली सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर त्यांना बहुमत सिद्ध करणं भाग पडलं होतं. (Nepal PM KP Sharma Oli loses confidence vote in Parliament)

पंतप्रधान ओली यांनी २७५ सदस्यीय सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी आणलेल्या विश्वासदर्शक ठराव जिंकण्यात अपयशी ठरले. बहुमत चाचणीपूर्वी ओली यांना मोठा झटका बसला होता. कारण त्यांच्या पक्षातील खासदारांच्या एका गटाने सोमवारी संसदेच्या विशेष सत्रामध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला होता.

पक्षाच्या असंतुष्ट गटाच्या २०हून अधिक खासदारांनी संसदेच्या विशेष सत्रावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे पंतप्रधानांना आपल्या पक्षाच्या असंतुष्ट गटाची मतं न मिळण्याचं संकट निर्माण झालं होतं. तत्पूर्वी एक दिवस आधी ओली यांनी पक्षाच्या असंतुष्ट गटाकडून घाईगडबडीत कोणताही निर्णय न घेण्याचं आवाहन केलं होतं.

ओली यांनी म्हटलं होतं की, "मी सर्व खासदारांचं याकडे लक्ष वेधू इच्छितो की, कोणताही निर्णय घेण्यात घाईगडबड करु नये. आपण सर्वजण एकत्र बैठक करुयात, चर्चा करुयात आणि कोणत्याही समस्येवर तोडगा काढुयात. ओली यांची फेब्रुवारी २०१८मध्ये पुष्पकमल दहल ऊर्फ प्रचंड यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळच्या (माओवादी सेंटर) पाठिंब्याने पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT