Nepal Prime Minister KP Sharma Oli announces cabinet decision to continue social media ban, sparking debates on digital freedom.

 

esakal

ग्लोबल

Nepal PM KP Sharma Oli : नेपाळच्या पंतप्रधानांची मोठी घोषणा! ; 'पंतप्रधानपद गेलं तरी बेहत्तर, सोशल मीडियावरील बंदी हटवणार नाही'

Nepal social media ban : आणखी खळबळजनक बाब म्हणजे नेपाळच्या गृहमंत्र्यांनीही राजीनामा दिलेला आहे.

Mayur Ratnaparkhe

Nepal social media ban continues : नेपाळ सध्या धगधगत आहे. याला कारण म्हणजे सोशल मीडियावरील बंदी विरोधात त्या ठिकाणी झेन झी यांच्याकडून सुरू असलेलं हिंसक आंदोलन. प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत २० पेक्षा अधिकजणांचा मृत्यू झाला आहे.

तर आणखी खळबळजनक बाब म्हणजे नेपाळच्या गृहमंत्र्यांनीही राजीनामा दिला आहे.  त्यानंतर नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी तातडीने मंत्रीमंडळ बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर आता पंतप्रधानांनी मोठी घोषणा केली आहे. 'राष्ट्रीय सुरक्षेसाठी २७ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदी आवश्यक आहे. मी पद सोडण्यास तयार आहे, परंतु ही बंदी उठवणार नाही.  असं पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी जाहीर केलं आहे.

काठमांडू आणि इतर शहरांमध्ये भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि सोशल मीडिया बंदीविरोधात झेन झी यांनी केलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान ओली यांचे हे विधान आले आहे. आता पर्यंत या हिंसक आंदोलनात २० हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय आणि २५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

ओली सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, एक्स (पूर्वीचे ट्विटर), यूट्यूब, लिंक्डइन, रेडिट, स्नॅपचॅट यासह २७ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. सरकारने हे पाऊल उचलले आहे कारण या कंपन्यांनी नेपाळच्या कंपनी कायद्यानुसार देशात स्वतःची नोंदणी केलेली नाही. नोंदणीची अंतिम मुदत ४ सप्टेंबर रोजी संपली आहे.

त्याच वेळी, झेन झी निदर्शक ओली सरकारच्या या निर्णयाला त्यांचा भ्रष्टाचार लपवण्याचा आणि विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न मानत आहेत. हिंसक निदर्शनांनंतर, काठमांडूमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे आणि शाळा आणि महाविद्यालये अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहेत. सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: टीम इंडिया कोणत्या Playing XI सह मैदानावर उतरणार? प्रशिक्षकाने दिली महत्त्वाची हिंट...

Pune University : विद्यापीठाच्या आदेशाची अवहेलना; वार्षिक अहवालासाठी १६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Rohit Sharma Video : रोहित शर्मा मध्यरात्री कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये; कारण काय? Viral Video ने वाढवली चाहत्यांची धडधड

Latest Marathi News Updates: उपराष्ट्रपती पदासाठी मतदान सुरु, पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

Explained: औषधांशिवाय रक्तवाहिन्या निरोगी ठेवायच्या आहेत? हृदयरोगतज्ज्ञांनी सांगितले 'हे' 4 सोपे उपाय

SCROLL FOR NEXT