Cyclone Gabriel National Emergency
Cyclone Gabriel National Emergency esakal
ग्लोबल

Cyclone Gabriel : 'या' देशात चक्रीवादळाचा कहर; 40 हजार घरांत वीज पुरवठा खंडित, राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

सकाळ डिजिटल टीम

उत्तर बेटावर उष्णकटिबंधीय वादळाचा तडाखा बसल्यानंतर न्यूझीलंड सरकारनं आज (मंगळवार) राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. न्यूझीलंडच्या इतिहासात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर होण्याची ही तिसरी वेळ आहे.

2019 मध्ये क्राइस्टचर्च दहशतवादी हल्ल्यांनंतर आणि 2020 मध्ये कोविड महामारीच्या काळात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.

40 हजारांहून अधिक घरांत वीज खंडित

'गॅब्रिएल' चक्रीवादळामुळं न्यूझीलंडच्या उत्तर बेटावर मोठ्या प्रमाणात पूर आणि भूस्खलन झालंय. तसंच समुद्राच्या लाटाही उसळत आहेत. न्यूझीलंडमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळं 40,000 हून अधिक घरांची वीज गेलीये आणि शेकडो उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळं हजारो घरांत वीज नसल्यामुळं आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री किरन मॅकअनल्टी (Kieran McAnulty) यांनी या घोषणेवर स्वाक्षरी केली. मॅकअनल्टी म्हणाले, ही एक अभूतपूर्व हवामान घटना आहे. ज्याचा उत्तर बेटावर मोठा परिणाम होत आहे. पुराचं पाणी आणि भूस्खलनामुळं देशभरातील अनेक गावांचं मोठं नुकसान झालं आहे, असं त्यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT