Newbrew bear
Newbrew bear sakal
ग्लोबल

इथं बनतेय लघवी आणि सांडपाण्यापासून इको-फ्रेंडली बियर, वाचा काय आहे प्रकरण

सकाळ डिजिटल टीम

जगभरात बिअर लव्हर बरेच आहेत. वेगवेगळ्या फ्लेवरची बिअर आपण बघितली असेल पण सध्या सिंगापूरमध्ये एका बिअरची प्रचंड मागणी वाढली आहे पण जेव्हा तुम्हाला कळेल की ही बिअर कशापासून बनली आहे, तर तुम्हाला धक्काच बसेल. ही बिअर लघवी आणि सांडपाण्यापासून बनली आहे. या बिअरचे नाव न्यूब्रू (Newbrew) आहे. सध्या ही न्युब्रू नावाची बिअर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली. (Beer made from urine-and sewage at singapore Brewery goes viral on social medi

विशेष म्हणजे ही बिअर जगातील सर्वात इको-फ्रेंडली बिअर म्हणून ओळखली जात आहे. जी सुरक्षित पेयजल म्हणून आंतरराष्ट्रीय मानक सुद्धा पूर्ण करते पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की लघवी आणि सांडपाण्यापासून बनवलेली बिअर कशी काय सुरक्षित आणि इको-फ्रेंडली असावीत? पण हे खरंय.

पुनर्नवीनीकरण केलेल्या लघवी आणि सांडपाण्यापासून बनवलेल्या बिअरमध्ये सुगंधी सिट्रा, प्रीमियम जर्मन बार्ली माल्ट, आणि कॅलिप्सो हॉप्स, तसेच नॉर्वे, क्वेक मधील फार्म-हाऊस यीस्ट यासारख्या उत्कृष्ट घटकांचा वापर केला गेलाय. यात असलेले निवाटर माल्ट, हॉप्स आणि यीस्ट स्ट्रेनचे स्वाद दूषित करत नाही.

न्यूब्रू ही क्राफ्ट बिअर ब्रुअरी 'ब्रेवर्क्ज़' द्वारे 8 एप्रिल रोजी सिंगापूर येथे एका आंतरराष्ट्रीय परिषदेच्या संयोगाने लाँच केली गेली. पाण्याच्या पुनर्वापरासाठी आणि जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने न्यूब्रू ही सिंगापूरची सर्वात इको फ्रेंडली बिअर बनविण्यात आली आहे.

सिंगापूरमध्ये पाण्याची टंचाई ही खुप मोठी समस्या आहे. सिंगापूर पिण्याच्या पाण्यासाठी मलेशियाकडून पाणी विकत घेते. न्यूब्रू बिअरद्वारे सिंगापूरच्या पाणीटंचाईबद्दल जागरूकता निर्माण करणे तसेच जलसंकटाचा सामना करणे, हा प्रमुख उद्देश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT