Nikki Haley 
ग्लोबल

Nikki Haley beats Trump: ट्रम्प यांचा 'विजयी रथ' निक्की हेलींनी रोखला; अमेरिकेच्या इतिहासातील ठरल्या पहिल्या महिला

भारतीय वंशाच्या निक्की हेली यांनी (Nikki Haley) वॉशिंग्टन डीसीमधील रिपब्लिकन प्रायमरी निवडणुकीत प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे.

कार्तिक पुजारी

वॉशिंग्टन- भारतीय वंशाच्या निक्की हेली यांनी (Nikki Haley) वॉशिंग्टन डीसीमधील रिपब्लिकन प्रायमरी निवडणुकीत प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. रिपब्लिकन पक्षाकडून माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि निक्की हेले या राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आहेत.(Nikki Haley beats Donald Trump in Washington DC for first primary USA election)

वॉशिंग्टन डीसीमधील विजयाने निक्की हेली यांना मोठा दिलासा मिळालेला असणार आहे. कारण, याआधीच्या प्रायमरी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. ट्रम्प यांना हरवल्याने हेली यांचा हा विजय मोठा असल्याचं म्हटलं जातंय. विशेष म्हणजे अमेरिकेच्या इतिहासात रिपब्लिकन प्रायमरी जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिल्या ठरल्या आहेत. त्यामुळे हा विक्रम त्यांच्या नावावर झाला आहे.

वॉशिंग्टन डीसीमध्ये निक्की हेली यांना ६२.९ टक्के तर ट्रम्प यांना ३३.२ टक्के मतं पडली. त्यामुळे राजधानीच्या राज्यात ट्रम्प यांना नाकारण्यात आल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे याआधी ट्रम्प यांनी आठ प्रायमरी जिंकले आहेत. तसेच ओपिनियन पोलनुसार, यापुढील सर्व प्रायमरी निवडणुका तेच जिंकतील अशी शक्यता आहे.

अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी हा १०० टक्के शहरी भाग आहे. ट्रम्प यांचा दबदबा ग्रामीण भागात आहे. ट्रम्प यांनी अनेकदा वॉशिंग्टन डीसीबाबत नकारात्मक वक्तव्य केली आहे. त्यामुळे येथील जनतेला त्यांची साथ नसल्याचं दिसतं. ट्रम्प यांच्यासह इतर काही नेते वॉशिंग्टनला क्राईट सिटी मानतात.

रिपब्लिकनकडून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार होण्यासाठी १,२१५ प्रतिनिधींचे समर्थन आवश्यक असते. अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यामध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहे. यात डेमोक्रेटकडून जो बायडेन आणि रिपब्लिकनकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यातच लढत होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडण्यासाठी आधी पक्षाअंतर्गत प्रायमरी निवडणुका होतात. यात पक्षाकडून आधी राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडला जातो. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : मुंबईत पावसाची संततधार सुरु, सखल भागांत पाणी साचले

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT