PNS Siddique in Turbat 
ग्लोबल

Pakistan Under Attack: पाकमधील दुसऱ्या सर्वात मोठ्या नौसेना तळावर हल्ला; माजिद ब्रिगेडकडून भयानक गोळीबार, बॉम्बस्फोट

PNS Siddique in Turbat: पाकिस्तानमधील दुसऱ्या सर्वात मोठ्या नौसेना तळावर हल्ला झाला आहे. तुरबतमधील पीएनएस सिद्दिकी नौसेना तळावर हा हल्ला झाल्याचं स्थानिक माध्यमांनी सांगितलंय.

कार्तिक पुजारी

इस्लामाबाद- पाकिस्तानच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. पाकिस्तानमधील दुसऱ्या सर्वात मोठ्या नौसेना तळावर हल्ला झाला आहे. तुरबतमधील पीएनएस सिद्दिकी नौसेना तळावर हा हल्ला झाल्याचं स्थानिक माध्यमांनी सांगितलंय. बंदी असलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या Balochistan Liberation Army (BLA) माजिद ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

बलुचिस्तानमध्ये चीन करत असलेल्या गुंतवणुकीवर माजिद ब्रिगेड नाराज आहे. चीन आणि पाकिस्तान बलुचिस्तानच्या संसाधनांचे शोषण करत असल्याचा आरोप माजिद ब्रिगेडचा आहे. बीएलएने दावा केलाय की, त्यांचे फायटर्स नौसेना तळामध्ये घुसले आहेत. माहितीनुसार, या भागात चिनी ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. (Pakistan second-largest naval air station PNS Siddique in Turbat came under attack BLA Majeed Brigade)

स्थानिक माध्यमातील माहितीनुसार, परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला जात आहे. अनेक हेलिकॉप्टर घटनास्थळी आले आहेत. लष्करी कारवाई वाढली आहे. गेल्या तीन तासांपासून याठिकाणी मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि स्फोट होत आहे. तुरबतमधील अनेक रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

बीएलएकडून दावा करण्यात आलाय की, आतापर्यंत डझनपेक्षा जास्त पाकिस्तान कर्मचाऱ्यांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे. बीएलएकडून यासंदर्भात एक ऑडिओ देखील समोर आणण्यात आला आहे. यात पीएनएस सिद्धिकी तळावरील कथित एक फायटर सांगत आहे की, अनेक वाहनांना लक्ष करण्यात आले आहे. जोरदार हल्ला सुरु आहे.

पाकिस्तानमध्ये हल्ल्यांचे प्रमाण वाढले

माजिद ब्रिगेडकडून झालेला हा आठवड्यातील दुसरा तर या वर्षातील तिसरा हल्ला आहे. याआधी २९ जानेवारी रोजी पाकिस्तानच्या माच शहरावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर २० मार्च रोजी ग्वादर बंदरावर हल्ला झाला होता. याच ठिकाणी लष्कराचे एक गुप्त मुख्यालय आहे. या हल्ल्यामध्ये दोन पाकिस्तानी कर्मचारी आणि आठ दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती.

ग्वादर बंदर हे पाकिस्तान आणि चीनमधील महत्वाच्या इकॉनॉमिक कॉरिडोरचा भाग आहे. डॉनच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये विशेषत: खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. पाकिस्तानमधील बंदी असलेली दहशतवादी संघटना तेगरिक-ए-तालिबानसोबत युद्धविराम रद्द झाल्याने या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

५ मिनिटाच्या रस्त्यासाठी अर्धा तास! राज ठाकरेंना अनुभवावं लागलं पुण्याचं ट्रॅफिक... रोज कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांच्या मनस्तापात भर

Car Prices: फक्त काही दिवस थांबा! गाड्या 1.5 लाखांनी स्वस्त होणार? काय आहे कारण?

Pasha Patel statement : ‘’... त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार’’; अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल अन् पाशा पटेलांचं वादग्रस्त विधान!

Ganesh Chaturthi 2025 : भाद्रपद महिना 'या' राशींसाठी घेऊन येणार मोठा ट्विस्ट, बाप्पाच्या येण्याने होणार संकटांचा विनाश

Solapur News: रहाटेवाडी-तामदर्डी पूल बांधकामासाठी कोटी ६ कोटी ५० लाख निधी मंजूर, जनतेच्या मागणीला यश

SCROLL FOR NEXT