ग्लोबल

Pandemic History : महामारीमुळं दीड लाख लोकांना जिवंत जाळलं! वाचा थरकाप उडवणारी घटना

या बेटावर मानसिक रुग्णांसाठी एक हॉस्पिटलही

सकाळ वृत्तसेवा

16 व्या शतकात या बेटावर एक महामारी आली होती. पुढे काळा ताप नावाचा आजारही येथे पसरला. नंतर येथे मानसिक रुग्णांसाठी रुग्णालयही बांधण्यात आले.जगात अशी अनेक सुंदर बेटे आहेत, जिथे वर्षाचे 12 महिने पर्यटकांची गर्दी असते.

ही बेटे पाहण्यासाठी लोक लांबून येतात. जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांचे गूढ उकललेले नाही. अशी अनेक बेटे आहेत, जिथे अनेक प्रकारच्या कथा सांगितल्या जातात, त्यापैकी काही घाबरवतात, तर काही आश्चर्यचकित करतात. अशीच कथा आहे पोवेग्लिया बेटाची.

भारतासोबत पूर्ण जगातील अनेक देशांनी कोरोनाशी झुंज दिली आहे आणि आजही त्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करता आहेत. सरकारही लसीकरणाबाबत गंभीर आहे. बूस्टर डोस आणि मुलांचे लसीकरणही देशात सुरू झाले आहे, या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. एकंदरीत सरकार खूप संयमाने आपली साथ देते आहे.

पण सगळीकडेच असं होत अस नाही, १६ व्या शतकात जेव्हा इटलीमध्ये प्लेगची साथ आली आणि हे सगळं हाताबाहेर जायला लागलं तेव्हा इटलीमधील व्हेनिस आणि लिडो या शहरांमध्ये असलेल्या व्हेनेशियन खाडी मधल्या पोवेग्लिया बेटावर क्वारेंटाईन क्षेत्र तयार करण्यात आले होते.

हे बेट आधी खूप सुंदर होते आणि पर्यटक नेहमी इथे भेट देत असत पण या साथीच्या वेळी इथे फक्त प्लेग झालेल्या लोकांना पाठवल जात होत. हळूहळू प्लेग खूप वाढला होता काही इतिहासकारांच्या मते लोकं खूप वाढलेले आणि जागा कमी पडत होती म्हणून इथल्या जवळजवळ १ लाख ६० हजार लोकांना जिवंत जाळलं गेलं होत. प्लेग गेल्यावर इटलीमध्ये दुसऱ्या रोगाची लाट आलेली याही वेळी त्यातून मेलेल्या लोकांना तसच या बेटावर सोडून दिलेलं. यामुळे निसर्गाची ही सुंदर कलाकृती एका नरकाहून कमी वाटतं नव्हती.

मानसिक रुग्णांसाठी रुग्णालय

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नंतर या बेटावर मानसिक रुग्णांसाठी एक हॉस्पिटलही बांधण्यात आले. मात्र, हे हॉस्पिटलही १९६० च्या दशकात काही कारणांमुळे बंद पडले होते. यानंतर लोक इथे जायच्या नावालाच टाळाटाळ करू लागले. या बेटावर सुमारे 100 कुटुंबे राहू शकतील असे सांगितले जाते. मात्र, कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीच्या हालचालींना मनाई आहे.

स्थानिक लोक काय म्हणतात

अनेक लोक या बेटाला भितीदायक आणि मृत्यूचे बेट मानतात. त्याचबरोबर स्थानिक लोकही याला शापित बेट मानतात. येथे जाळून मारल्या गेलेल्यांचे आत्मे आजही भटकत असल्याच्या बातम्या स्थानिक लोकं देत असतात. या बेटावर अनेकांनी आत्मे दिसल्याचा आणि विचित्र आवाज ऐकण्याचा दावा केला आहे.

सरकारने बंदी घातली आहे

खरतर भुतप्रेत अशा गोष्टींना विज्ञानात मान्यता नाही पण या बेटावर सतत काहीना काही घटना घडतच राहिल्या; इथे गेलेला व्यक्ती कधीही परत आला नाही; शिवाय या बेटाची जगातील भीतीदायक ठिकाणांमध्ये गणना केली जाते. त्यामुळे इटालियन सरकारने या बेटावर पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT