People have to test the wall of this restaurant by licking their tongue
People have to test the wall of this restaurant by licking their tongue  sakal
ग्लोबल

'या' रेस्टॉरंटमध्ये जेवणासोबत चाटावी लागते भिंत, वाचा काय आहे प्रकरण

सकाळ डिजिटल टीम

जगात अशा अनेक गोष्टी असतात ज्या अचंबित करणाऱ्या असतात.काही ठिकाणी इतके अविश्वसनीय नियम असतात, की हे खरंच असं होतंय का असा प्रश्न पडतो. सध्या अशाच एका रेस्टॉरंटची चर्चा सुरू आहे. या रेस्टॉरंटचा नियम ऐकाल तर तुम्ही म्हणाल, हा कसला नियम? या ठिकाणी जेवायला येणाऱ्यांना जेवणासोबत चक्क भिंत चाटावी लागते. हो,हे खरंय.हे रेस्टॉरंट अमेरिकेच्या स्कॉट्सडेलमध्ये आहे. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय. (People have to test the wall of this restaurant by licking their tongue along with the food)

‘द मिशन’ नावाच्या रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडतो.येथे जेवायला येणाऱ्या लोकांना जेवणासोबतच आपल्या जीभेने रेस्टॉरंटची भिंतही चाटून टेस्ट करावी लागते.येथील ही भिंत गेल्या 17 वर्षांपूर्वी बांधली होती तर विशेष म्हणजे ही भिंत स्वादिष्ट आहे.त्याचे एकमेव कारण म्हणजे ही भिंत गुलाबी हिमालियन मीठापासून बनवली आहे. यामुळेच लोकांना या भिंतीची चव आवडते.

ही भिंत हेडशेफने येथे आणली होती. मात्र भिंत चाटण्याच्या प्रकणावरुन या रेस्टॉरंटला ट्रोल करण्यात आलं होतं. यामुळे रोगं पसरण्याची शक्यता आहे, असा दावा करत रेस्टॉरंटवर बरीच टीका केली गेली. तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ही भिंत हिमालयीन रॉक सॉल्टपासून बनलेली आहे.यात स्वच्छतेचे गुणधर्म आहेत ज्यामुळे कोणताही रोग होत नाही.

सध्या या रेस्टॉरंटची आणि तेथील भिंतीची जोरदार सर्वत्र चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावप नेटकऱ्यांनीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT