Children
Children esakal
ग्लोबल

चिंताजनक! प्लास्टिकची खेळणी मुलांसाठी धोकादायक

बाळकृष्ण मधाळे

'प्रदूषण आणि प्लास्टिक' जगासाठी एक नवीन धोका म्हणून उदयास येत आहे.

'प्रदूषण आणि प्लास्टिक' जगासाठी एक नवीन धोका म्हणून उदयास येत आहे. अमेरिकेतील (America) न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या (NewYork University School of Medicine) शास्त्रज्ञांनी उघड केलंय, की लहान मुलांच्या शरीरात प्रौढांपेक्षा 15 पट जास्त प्लास्टिकचे कण असतात. मुलांच्या शरीरात प्लास्टिकचे एवढे प्रमाण त्यांच्या भविष्यासाठी, तसेच आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत, असं त्यांनी एका अहवालात स्पष्ट केलंय.

संशोधक प्रा. कुरुंथाचालाम कन्नान (Kurunthachalam Kannan) सांगतात, पाच मिमी पेक्षा कमी आकाराचे प्लास्टिकचे सूक्ष्म कण वातावरणात झपाट्याने वाढत आहेत. घरांमध्ये प्लास्टिकच्या वस्तूंचा वापरही वाढतोय. त्यामुळे प्रौढांपेक्षा मुलांच्या शरीरात प्लास्टिकचे सूक्ष्म कण वेगाने वाढताना दिसताहेत. संशोधकांनी संशोधनादरम्यान मुलांच्या शरीरात सूक्ष्म प्लास्टिक तंतूंची पुष्टी केली. यात मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये पीसीचे प्रमाण समान असल्याचे आढळले, तर प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये पीईटीचे प्रमाण 15 पट जास्त असल्याचे दिसून आले.

प्लास्टिकचा वापर टाळा

प्रा. कन्नान म्हणतात, लहान मुलांच्या वापरासाठी बनवलेली उत्पादने प्लास्टिक व्यतिरिक्त इतर पदार्थांपासून बनवावी लागतील, ज्यामुळे त्यांना सूक्ष्म प्लास्टिकच्या कणांच्या प्रदर्शनापासून वाचवता येईल. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे, की मुलांमध्ये पीईटीचे प्रमाण वाढण्याचे कारण म्हणजे खेळण्यांसह कार्पेटवर गुडघे टेकताना त्यांच्या शरीरातील दूषित रसायने बाहेर पडणं.

नवजात मुले आणि प्रौढांच्या विष्ठेची तपासणी

सहा नवजात आणि दहा प्रौढांच्या विष्ठाची तपासणी केल्यानंतर शास्त्रज्ञांनी हा खुलासा केलाय. चाचणीमध्ये मुलांच्या आणि प्रौढांच्या शरीरात पॉलीथिलीन टेरेफ्थलेट आणि पॉली कार्बोनेटचे स्तर आढळले. या दरम्यान, अशा 3 मुलांच्या मलाची तपासणी केली गेली, ज्यांना जन्मानंतर पहिल्यांदा आतड्यांची हालचाल होती. शास्त्रज्ञांच्या मते, मुलांमध्ये प्लास्टिकचे कण भविष्यासाठी धोकादायक ठरु शकतात, असा त्यांनी अहवाल दिलाय.

मुलांमध्ये प्लास्टिकचे प्रमाण जास्त का आहे?

प्लास्टिकच्या वस्तूंपासून बनवलेली खेळणी, दुधाच्या बाटल्या, प्लास्टिकचे चमचे, बेडवर प्लास्टिकच्या चादरी, तोंडावर प्लास्टिक फीडर हे मुलांच्या शरीरात प्लास्टिकचे प्रमाण वाढण्याचे मुख्य कारण आहे. मुलांचे कपडे सुंदर बनवण्यासाठी प्लास्टिकचा सर्रास वापर होतोय. ज्याला स्पर्श केल्यानंतर मुलं तोंडात हात घालतात, त्यामुळे प्लास्टिकचा घटक शरीरात पसरण्यास कारणीभूत ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हारायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT