Baghdad Parliament Building esakal
ग्लोबल

Iraq : इराकमध्येही श्रीलंकेसारखी परिस्थिती; आंदोलकांचा संसद भवनावर ताबा

श्रीलंकेसारखी परिस्थिती आता इराकमध्येही दिसून येत आहे. इराकमध्येही (Iraq) उग्र निदर्शनं होत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

श्रीलंकेसारखी परिस्थिती आता इराकमध्येही दिसून येत आहे.

बगदाद : श्रीलंकेतील (Sri Lanka) राजकीय अस्थैर्य आणि आर्थिक संकटामुळं तेथील लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. श्रीलंकेतील सर्वसामान्य जनता काही दिवसांपूर्वी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली होती आणि त्यांनी राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानावर कब्जा केला होता. श्रीलंकेसारखी परिस्थिती आता इराकमध्येही दिसून येत आहे. इराकमध्येही (Iraq) उग्र निदर्शनं होत आहेत.

बगदादमधील संसद भवनावर (Baghdad Parliament Building) बुधवारी आंदोलकांनी कब्जा केला. पंतप्रधानपदाचे उमेदवार मोहम्मद शिया अल-सुदानी (Mohammed Shia al-Sudani) यांच्या विरोधात ही निदर्शनं होत आहेत. बहुतेक आंदोलक शिया नेते मुक्तदा अल-सदर यांचे समर्थक आहेत. अल-सुदानी हे माजी मंत्री आणि माजी प्रांतीय गव्हर्नर आहेत.

न्यूज एजन्सी अल जझीरानं दिलेल्या वृत्तानुसार, संसद भवनात आंदोलक गाताना आणि नाचताना दिसत आहेत. इराकी संसदेच्या स्पीकरच्या डेस्कवर एक व्यक्ती झोपलेला दिसत असून विरोधकांनी संसद भवनात प्रवेश केला, तेव्हा एकही खासदार तिथं उपस्थित नव्हता. संसदेत सुरक्षा दलं उपस्थित असतानाही त्यांनी आंदोलकांना रोखलं नाही.

Baghdad Parliament Building

पंतप्रधान मुस्तफा अल-कादिमींचा आंदोलकांना इशारा

पंतप्रधान मुस्तफा अल-कादिमी (Mustafa al-Kadhimi) यांनी आंदोलकांना इशारा दिलाय. त्यांनी आंदोलकांना तातडीनं ग्रीन झोन सोडण्यास सांगितलंय. ग्रीन झोनमध्ये सरकारी इमारती आणि राजनैतिक मिशनची घरं आहेत. पंतप्रधानांनी एका निवेदनात म्हटलंय की, 'राज्य संस्था आणि परदेशी मिशनच्या सुरक्षा व्यवस्थेचं कोणतंही नुकसान आंदोलकांकडून होत कामा नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल.' पंतप्रधानांच्या इशाऱ्यानंतर आंदोलक संसद भवनातून बाहेर पडू लागलेत. तत्पूर्वी, पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी पाण्याच्या तोफांचा वापर केला. मात्र, तरीही अनेकांनी तोडफोड केली. आंदोलक ‘अल-सुदानी, आऊट’च्या घोषणाही देताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT