rishi sunak  esakal
ग्लोबल

Rishi Sunak महिला मुलांच्या अत्याचारा विरोधात सुनक यांनी आखली योजना

मला असा समाज पाहिजे जिथे आपल्या महिला आणि मुली सुरक्षित असतील

सकाळ डिजिटल टीम

ब्रिटनचे काळजीवाहू पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री ऋषी सुनक (Rishi Sunak) यांचं नाव पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. ऋषी सुनक यांनी आश्वासन दिले आहे की ते (UK)मधील मुले आणि मुलींना लक्ष्य करणाऱ्या टोळ्या शोधून त्यांचा नायनाट करणार.

यासोबतच या टोळ्यांच्या मोहक्यांना जास्तीत जास्त तुरुंगवासाची शिक्षा दिला जाणार आहे. ऋषी सुनक हे कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि पुढील ब्रिटिश पंतप्रधानपदाच्या प्रचारात दरम्यान ही शपथ घेतली आहे. त्याच्या रेडी फॉर ऋषी मोहिमेच्या टीमने सांगितले की अशा टोळ्यांच्या सदस्यांवर कारवाई केली जाईल आणि त्याच्या टोळीत सामील असलेल्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली जाईल.

लैंगिक-गुन्हेगारांबद्दल कठोरात कठोर भूमिका घेत, माजी अर्थमंत्र्यांनी सांगितले की ते कथित डाउन-ब्लाउजिंगवर देखील बंदी घालतील ज्यामध्ये ब्लाउजच्या आत डोकावणाऱ्या महिलांचे फोटो त्यांच्या परवागी शिवाय घेतले जातात आशांवर कठोरात कठोर करणार.यामुळे लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याला प्रतिबंध करता येईल.

ऋषी सुनक म्हणाले महिला आणि मुलींवरील लैंगिक हिंसाचारावर आळा बसत नाही तो पर्यंत राष्ट्रीय आणीबाणी मानली पाहिजे. दोन मुलींचा बाप असल्याने मला वाटत की संध्याकाळी किंवा रात्री दुकानात त्यांना बिंदास फिरता यावे, ऋषी सुनक हे अनुष्का आणि कृष्णा या दोन मुलींचे वडील आहेत.

ऋषी सुनक म्हणाले की, अर्थमंत्री या नात्याने मी पीडितांना मोठ्या प्रमाणावर मदत केली. यासोबतच त्यांनी लैंगिक गुन्हेगारांच्या प्रकरणांबाबत पोलिसांसाठी एक नवीन प्रणाली तयार करण्यात मदत केली.

ऋषी सुनक म्हणाले, "पंतप्रधान या नात्याने मी आणखी पुढे जाईन. जर एखाद्या महिलेच्या संमतीशिवाय तिचे वैयक्तिक फोटो काढून कोणी त्रास दिला, तर मी हा गुन्हा ठरवेन,मला असा समाज पाहिजे जिथे आपल्या महिला आणि मुली सुरक्षित असतील.

भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे (Infosys) चे संस्थापक नारायण मुर्ती यांचे जावई आहेत. त्यांनी सांगितल की ब्रिटेन च्या नेशनल क्राइम एजेंसी च्या सोबत मिळून एक टास्कफोर्स बनवून गुन्हेगारांचा नायनाट करील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT