Ukraine Russia War  टिम ई सकाळ
ग्लोबल

UN अध्यक्षांच्या दौऱ्यादरम्यानच रशियाचा युक्रेनवर हल्ला; १० जण जखमी

हा हल्ला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि संयुक्त राष्ट्रांचे अध्यक्ष गुटेरस यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर तासाभराच्या आतच झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनिओ गुटेरस युक्रेन दौऱ्यावर असतानाच युक्रेनमध्ये रशियाने हल्ला केला आहे. रॉकेटद्वारे केलेल्या या हल्ल्यामुळे १० जण जखमी झाले आहेत. काल संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास हा हल्ला झाला आहे.

या हल्ल्यामध्ये २५ मजल्यांच्या एक इमारतीच्या दोन मजल्यांचं नुकसान झालं आहे. तर आणखी एका इमारतीला आग लागली असून तिथून काळा धूर येताना दिसत असल्याचीही नोंद झाली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

अग्निशमन दलाचे १२ बंब घटनास्थळी दाखल झाले असून १० जण जखमी झाले आहेत. हा हल्ला संयुक्त राष्ट्रांचे अध्यक्ष आणि त्यांच्या गटासाठी धक्कादायक होता. मात्र त्यामध्ये त्यांना कोणतीही हानी झालेली नाही. हा युद्धजन्य भाग आहे, मात्र आमच्या इतक्या जवळ ही घटना घडली हे धक्कादायक आहे, अशी भावना प्रवक्त्यांनी व्यक्त केली आहे.

गुटेरस आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची संयुक्त पत्रकार परिषदेला एक तास उलटण्यापूर्वीच हा हल्ला झाला. या पत्रकार परिषदेच्या ३.५ किलोमीटरच्या परिसरातच हा हल्ला झाला. या हल्ल्याबद्दल बोलताना झेलेन्स्की म्हणाले की, आज क्यीवमध्ये आमची चर्चा पार पडल्यानंतर लगेचच रशियाच्या क्षेपणास्त्रांनी शहरावर हल्ला केला. यावरून रशियाच्या नेतृत्वाचे संयुक्त राष्ट्रांना तसंच ही संघटना ज्या तत्वांचं प्रतिनिधित्व करते, त्यांना अपमानित करण्याचे प्रयत्न दिसून येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

Blinkit-Zeptoवरून ५ किलोपेक्षा जास्त साखर मिळणार नाही! सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना झटका; Online खरेदीवर मर्यादा...

Marathi News Live Updates : 'लाडक्या बहिणींना' नागपूर महानगर पालिकेतर्फे रक्षाबंधनाची भेट

Mumbai Local: पार्किंगची फेररचना, नायगाव-भाईंदरमध्ये ३१ नव्या मार्गिका; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT