ukraine russia dispute ukraine russia dispute
ग्लोबल

Ukraine-Russia Crisis : रशिया युक्रेनमध्ये कोण सरस! जाणून घ्या दोघांची लष्करी ताकद

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली आहे

सकाळ डिजिटल टीम

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली आहे. पण दोन्ही देशांच्या सामर्थ्य, क्षेत्रफळ आणि सैन्याचा विचार केला तर रशिया युक्रेनपेक्षा कितीतरी पटीने शक्तीशाली आहे. रशियाची सेना आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे. पण, अशा परिस्थितीत रशियाचा हल्ला करणे सुरूच राहिले आणि युक्रेनला इतर कोणत्याही देशाकडून मदत मिळाली नाही, तर ही लढाई कमी-अधिक प्रमाणात एकतर्फी आहे.

एकेकाळी युक्रेन सोव्हिएत संघाचा भाग होता. तसेच तो रशियासोबत होता. पण १९९१ साली युक्रेन सोव्हिएत युनियनपासून वेगळा झाला. युक्रेनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणाऱ्या देशांमध्ये भारत हा एक देश होता. गेल्या तीन दशकांपासून युक्रेन-रशिया यांच्यातील संबंध कटू झाले आहेत. त्यामागे अनेक कारणे आहेत. युक्रेनने नाटोत प्रवेश हे एक मोठे कारण आहे.

Russia Ukraine Conflict

लष्करी खर्च, क्षेत्रफळात मोठे अंतर - रशियाचे क्षेत्रफळ युक्रेनच्या पाचपट जास्त आहे. युक्रेन हा रशियानंतर युरोपमधील दुसऱ्या क्रमांकाचा देश असला तरी तो हळूहळू ते विकसित होत आहे. रशिया त्यांच्या लष्करावर 61.7 अब्ज खर्च करत असेल, तर युक्रेनचे संरक्षण बजेट हे 5.4 अब्ज आहे. तसेच युक्रेनमधील सध्याचे सरकार हे रशियाच्या विरोधात आहे.

रशियाचे सैन्यदल सरस- जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सैन्य रशियाकडे आहे. यात एकूण 9 लाख सैनिक आणि अधिकारी आहेत. तर युक्रेनचे सुमारे 2.10 लाख लष्करी सामर्थ्य आहे. तसेच शस्त्रास्त्रे आणि आधुनिकीकरणाच्या बाबतीत रशिया युक्रेनपेक्षा खूप पुढे आहे. त्यांच्याकडे जगभरात नावाजली जातात अशी शस्त्रास्त्रे आहेत.

Ukraine Russia War

रणगाड्यांची ताकद - रणगाडे हे नेहमीच रशियन सैन्याची ताकद आहेत. रशियाकडे 12,420 युद्ध रणगाडे आहेत, तर युक्रेनकडे फक्त 2,596 आहेत. रशियाकडे बख्तरबंद लष्करी वाहनांची संख्या 30 हजारांच्या वर आहे, तर युक्रेनमध्ये ही संख्या 12303 आहे.

Ukraine Russia

हवाई ताकदीत रशियाच पुढे- वायुसेनेत रशिया ताकदवान आहे. त्यांचे वर्चस्व संपूर्ण जगाने ओळखले आहे. रशियाकडे 4,173 एअरक्राफ्ट आहेत, जी युक्रेनच्या 772 एअरक्राफ्टपेक्षा सहापट जास्त आहेत. रशियाकडे 318 लढाऊ विमाने आहेत तर युक्रेनकडे फक्त 60 आहेत.

नौदल ताफाही मोठा- दोघांच्या नौदल ताफ्यात कमालीचा फरक आहे. रशियाच्या नौदल ताफ्यात 605 जहाजे आणि 30 पाणबुड्या आहेत, तर युक्रेनकडे फक्त 38 नौदल जहाजे आहेत. तर, पाणबुड्या नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT