Sandwich Shoes Viral on Internet  Sakal
ग्लोबल

चर्चा तर होणारच! सँडविच शूजवर लोक फिदा; नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया

Sandwich Shoes Viral on Internet : सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका खास बूटाची चर्चा आहे. हा सँडविच शूज (Sandwich Shoes) इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sandwich Shoes Viral on Internet : जगात फॅशनच्या (Fashion) नावाखाली लोक काय करतील याचा नेम नाही. काहीजण लाखो रुपये खर्चून फाटलेले स्वेटर विकत घेऊन घालतील तर काहीजण कसल्याशा रंगांचा ड्रेस घालतील. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका खास बूटाची चर्चा आहे. हा सँडविच शूज (Sandwich Shoes) इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे. याला शूज तुम्हाला शूज कमी आणि सँडविच किंवा बर्गर जास्त वाटेल.

डेली सँडविच प्लॅटफॉर्म स्नीकर्स (Deli Sandwich Platform Sneakers) नावाने ओळखले जाणारे हे शूज सँडविचसारखे दिसतात. याला बेज रंगाच्या बन एरिया आणि थ्रीडी वेगन लेदरसोबत, सॅलेमी, लेट्यूस, चीज आणि कांदाही भरून बनवले गेलं आहे. हे शूज पाहिल्यानंतर तुम्हाला बर्गर किंवा सँडविच खावासा नक्की वाटेल.

सँडविच शूजवर लोक फिदा (People Loves sandwich Shoes)-

डेली स्टारच्या वृत्तानुसार, इंटरनेटवरील या विचित्र शूजने लोकांना आपल्याकडे खेचले आहे. विशेषत: इंस्टाग्राम रील्सवर लोकांना हे शूज खूप आवडत आहेत. 8500 रुपयांना विकले जाणारे शूज डॉल्स किल (Dolls Kill ) क्लोदिंग स्टोअरने बनवले आहेत. हील्स डॉल्स किलने शूजचे फोटो इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केले आहेत आणि आतापर्यंत 3.8 दशलक्ष फॉलोअर्सनी ते पाहिले आहे. शूजचे विविधरंगी स्वरूप आणि चीज, कोशिंबिरीसाठी वापरण्यात काप तुम्हाला हसू येईल.

नेटकऱ्यांच्या मजेदार प्रतिक्रिया (Funny reactions from netizens)-

या पोस्टवर कमेंट करताना लोकांनी एकापेक्षा एक मजेदार कमेंट केल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले - मी सबवेमध्ये काम करतो आणि काम करण्यासाठी हे शूज नक्कीच घालेन. दुसर्‍या युजरने लिहिले - आयुष्य एकच आहे आणि थोडे वेगळे असल्यामुळे मी ते नक्कीच घालेन. त्याच वेळी, काही लोकांना हे शूज अजिबात आवडले नाहीत. त्यांनी विचित्र या विचित्र बुट घालायला नकार दिला. ज्यांना वेगळे दिसायचे आहे किंवा फॅन्सी ड्रेस स्पर्धेत जाण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी हे शूज योग्य आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NavIC: आता भारतीयांना रस्ता गुगल मॅप्स नाही, तर'नाविक' सांगणार; सरकारची नेमकी योजना काय?

Narayangaon News : पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; एक किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Mahadev Jankar : सरकार शक्तिपीठ महामार्गाला तरतूद करते, मात्र निवडणूक आश्वासनातील कर्जमाफीला तरतूद करत नाही

JDU Expelled Leaders: मोठी बातमी! निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाकडून ११ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, कारण काय?

ICC Womens World Cup 2025 : ठरलं! भारत सेमीफायनलमध्ये अपराजित ऑस्ट्रेलियाशी भिडणार; द. आफ्रिकेला हरवत कांगारूं पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल...

SCROLL FOR NEXT