Sex Tournament esakal
ग्लोबल

Sex Tournament : बाबो.. आता होणार सेक्सची चँपियनशीप स्पर्धा! असे आहेत १६ चित्रविचित्र नियम

स्वीडनने नुकतच सेक्सला आपल्या देशात खेळाचे स्थान देण्याच जाहिर केलं आहे.

धनश्री भावसार-बगाडे

Sweden Sex Tournament : जगात शेकडो प्रकारच्या स्पर्धा आहेत. ज्यात जगभारातून हजारो लोक सहभागी होत असतात. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, वॉलिबॉल, हॉकी, बॅडमिंटन आणि बेसबॉल असे खेळ साधारण सगळ्यांनाच माहिती आहेत. पण आता स्वीडनने अशा खेळाला जगासमोर आणायचं ठरवलंय जे ऐकून पहिलेतर कोणाला विश्वासच बसणार नाही.

स्वीडन जगातला असा पहिला देश बनला आहे ज्याने सेक्सला एक खेळ म्हणून ओळख देऊ केली आहे. स्वीडन यूरोपियन सेक्स चँपियनशीपचे आयोजन करत आहे.

वृत्तानुसार स्वीडनने नुकतच सेक्सला एक खेळ म्हणून रजिस्टर केलं आहे. यूरोपीयन सेक्स चँपियनशीपचं आयोजन याच महिन्याच्या ८ जून पासून केलं जाईल. यात एकूण २० देशांच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

अनेक आठवडे चालणाऱ्या या चँपीयनशीपमध्ये स्पर्धकांना रोज ६ तास स्पर्धा करावी लागेल. मॅच सुरू करण्या आधी तयारी करायला त्यांना ४५ मिनीट दिले जातील. या स्पर्धेसाठी स्पर्धकांमध्ये बराच उत्सहा दिसून येत आहे.

स्पर्धेचे नियम

  • यूरोपियन सेक्स चँपियनशीपमध्ये एकून १६ स्पर्धा असतील.

  • यात सीडक्शन, ओरल सेक्स, पेनिट्रेशन, मसाज, अपीयरेंस, मोस्ट अॅक्टीव्ह कपल आदी गोष्टींचा समावेश असेल.

  • प्रत्येक खेळाचा विजेता कोण हे जज आणि प्रेक्षकांच्या वोट वर ठरेल.

  • यात ३० टक्के मत हे परीक्षकांचे तर ७० टक्के प्रेक्षकांचे मत गृहित धरले जाणार आहे.

  • दोन्ही मते गृहित धरून मुल्यांकन केलं जाईल.

नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार स्वीडिश फेडरेश ऑफ सेक्सचे अध्यक्ष ड्रॅगन ब्राटीक यांनी सांगितलं की, सेक्सला खेळाचा दर्जा दिल्याने लोकांमध्ये मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्या संदर्भात प्रोत्साहन मिळेल. शिवाय सामाजत सेक्स विषयी असलेल्या टॅबूतून बाहेर पडून खुलेपणा यायला यामुळे मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT