Solar Eclipse 2022: sakal
ग्लोबल

Solar Eclipse 2022: वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण आज दिसणार

सूर्यग्रहण शनिवारी दुपारी 12.15 वाजता सुरू होईल आणि रविवारी, 1 मे रोजी पहाटे 4:07 वाजता समाप्त होईल.

सकाळ डिजिटल टीम

2022 वर्षामधील पहिलं सूर्यग्रहण आज 30 एप्रिलला दिसणार आहे. जगात अमेरिकेचा काही भाग, पॅसिफिक ओशन, अटलांटिक आणि अंटार्टिकच्या काही भागात हे सूर्यग्रहण दिसणार आहे. खरं तर भारतीयांना या सूर्यग्रहणाचे साक्षीदार होता येणार नाही. (solar eclipse 2022: today is first surya grahan of this year)

धर्मशास्त्रीय आणि हिंदू कॅलेंडरनुसार, सूर्यग्रहण शनिवारी दुपारी 12.15 वाजता सुरू होईल आणि रविवारी, 1 मे रोजी पहाटे 4:07 वाजता समाप्त होईल.

सूर्यग्रहण दरम्यान हिंदू धर्म काही नियम पाळतात मात्र भारतामधून हे ग्रहण दिसणार नाही त्यामुळे ग्रहणाचे वेध, सुतककाळ पाळण्याचे बंधन भारतात नसणार. जरी ग्रहण भारतात दिसणार नसलं तरीही लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे ऑनलाईन खगोलप्रेमीं याला पाहू शकणार.

सूर्यग्रहण ही सामान्य खगोलीय घटना आहे. जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीला सूर्यग्रहण (Solar Eclipse) म्हणतात.

यंदाच्या एकूण 4 ग्रहणं येणार. त्यामध्ये 2 चंद्रग्रहणं आणि 2 सूर्यग्रहणं असणार त्यातील 30 एप्रिलचं सूर्यग्रहण भारतामधून दिसणार नसलं तरीही 16 मे दिवशी येणारे चंद्र ग्रहण भारतीयांना पाहता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

Sangli Girl : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दमदाटीने दोघांचे शारिरीक संबंध, आणखी दोघांनी त्याच मुलीवर केला विनयभंग; पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT