Food Crisis In Sri Lanka
Food Crisis In Sri Lanka  esakal
ग्लोबल

श्रीलंकेत अन्न व पाण्यासाठी मारामारी ! दोन हजार रुपयाला १ लिटर दूध मिळतयं

सकाळ डिजिटल टीम

कोलंबो : श्रीलंका सर्वात मोठ्या अन्नसंकटाला सामोरे जात आहे. देशात सर्व अत्यावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. त्यात महागाई सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. गरिबांपासून नोकरदार वर्गाची स्थिती फारच वाईट आहे. लोक देश सोडायला तयार झाले आहेत. श्रीलंकेत तीन दिवसांमध्ये दुधाच्या किंमतीत २५० रुपयांनी वाढ झाली आहे. (Food Crisis In Sri Lanka)

दोन हजार रुपयांना एक लिटर दूध

श्रीलंकेत (Sri Lanka) दुधाची टंचाई मोठ्या प्रमाणावर आहे. दुधाच्या कमतरतेमुळे किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. एक लिटर दुधासाठी लोकांना जवळपास दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत. ४०० ग्रॅम दूध खरेदीसाठी ७९० रुपये देत आहेत. दुधाच्या किंमतीत केवळ गेल्या तीन दिवसांमध्ये २५० रुपयांनी वाढ झाली आहे. आताही त्यात वाढ सुरुच आहे. एवढी मोठी रक्कम देऊनही दूध मिळेना. दुकानांमधून दुध पिशव्या गायब झाल्या आहेत. लोक म्हणतात, की श्रीलंकेत सोने सापडणे सोपे आहे. मात्र दुधासाठी तासन् तास भटकावे लागत आहे. ज्यांना दुध हवे आहे, त्यांना सकाळीच दुकानांकडे चक्कर मारावी लागत आहे. श्रीलंकेत दुध एक दुर्मिळ वस्तू बनली आहे. (Sri Lanka Food Prices Hikes Shortages Of Essentials Items)

तांदूळ आणि साखरेची टंचाई

श्रीलंकेत सरकारी धोरणांमुळे तांदूळ आणि साखरेची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. देशातील गोताबाया राजपक्षे सरकारने (Gotabaya Rajapaksa) रासायनिक खतांवर पूर्णतः बंदी आणून १०० टक्के सेंद्रिय शेतीवर जोर दिला. सरकारच्या या निर्णयामुळे देशात कृषी उत्पादन खूपच कमी झाले. तांदूळ आणि साखरेच्या टंचाईमुळे त्यांच्या किंमती दररोज आकाशाला भिडत आहेत. श्रीलंकेत तांदूळ आणि साखर २९० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. अंदाज आहे, की एका आठवड्याच्या आत तांदळाची किंमत ५०० रुपये होईल. लोक भविष्याविषयी चिंतीत आहेत. देशात साठेबाजीही वाढली आहे. कागदाच्या कमतरतेमुळे सरकारने शाळांमधील परीक्षा रद्द केल्या आहेत.

सेनेच्या उपस्थितीत मिळतयं तेल

आर्थिक संकटाने श्रीलंकेची कंबरडे मोडले आहे. पेट्रोलियम उत्पादनांची प्रचंड टंचाई आहे. देशातील पेट्रोलपंपांवर महागडे तेल खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या रांगांमध्ये उभे राहिल्याने तीन वयस्कर व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पेट्रोलपंपांवर सैन्याला तैनात केले गेले आहे. लोकांना सैन्याच्या उपस्थितीत एकेक लीटर तेलासाठी झगडावे लागत आहे.

का परिस्थिती बिघडली ?

श्रीलंकेच्या या स्थितीस अनेक कारणे जबाबदार आहेत. परकीय चलनाची टंचाई हे सर्वात मोठे कारण मानले जात आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी श्रीलंकेची परकीय गंगाजळी ७.५ अब्ज डाॅलर होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घटून ती १.५८ अब्ज डाॅलर झाली. श्रीलंकेवर चीन, जपान, भारत आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रचंड कर्ज आहे. परकीय गंगाजळीच्या टंचाईमुळे तो आपले कर्जाचे हफ्तेही फेडू शकलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT