इस्लामाबाद - युद्धग्रस्त अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) लष्करी मोहीम (Army Campaign) राबविण्यासाठी आपले लष्करी तळ अमेरिकेला (America) वापरू दिल्यास दहशतवादी (Terrorist) पाकला (Pakistan) लक्ष्य (Target) करतील आणि सूड उगविण्यासाठी हल्ले (Attack) करण्याचा धोका (Danger) निर्माण होईल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी स्पष्ट केले. (Terrorists will Target Pakistan if US Military Bases are Allowed to be Used)
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी या उभय नेत्यांच्या व्हाइट हाउसमधील नियोजित भेटीच्या पार्श्वभूमीवर इम्रान यांनी द वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक लेख लिहिला आहे. त्यात आपल्या निर्णयाचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, आम्हाला हे खचितच परवडणार नाही. आम्ही यापूर्वीच फार मोठी किंमत चुकविली आहे. अफगाणिस्तानात संघर्ष करणाऱ्या गटांमध्ये एकाची बाजू घेण्याची चूक आम्ही पूर्वी केली, पण त्यातून आम्ही बोध घेतला आहे. आता आमच्यासाठी कोणताही गट प्राधान्याचा नाही. अफगाण जनतेचा विश्वास असलेल्या कोणत्याही सरकारच्या साथीत आम्ही काम करू.
इम्रान यांनी न्यूयॉर्कवरील दहशतवादी हल्ल्याचा विस्ताराने उल्लेख केला आहे. तेव्हा अफगाणिस्तान विरुद्धच्या कारवाईचा समन्वय साधण्यासाठी अमेरिकी सैन्याला पाकने लष्करी तळ वापरण्याची परवानगी दिली होती.
२००८ पासून बलुचिस्तानमधील शम्सी हवाई तळाचा वापर अमेरिकेने केला होता. तेथून ड्रोनचे शेकडो हल्ले करण्यात आले. त्याद्वारे पर्वतराजीतील आदिम परिसरात लपलेल्या अल कायदाच्या संशयित हस्तकांना लक्ष्य करण्यात आले. काही हल्ले सीमेपलिकडे अफगाणिस्तानमध्येही करण्यात आले.
शांततेला प्राधान्य
अफगाणिस्तानबाबत अमेरिका आणि पाकिस्तान यांचे समान हितसंबंध असल्याचे नमूद करून इम्रान म्हणाले की, राजकीय तोडगा, स्थैर्य, आर्थिक विकास आणि दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रयास नकार असे मुद्दे समान आहेत. आम्हाला यादवी युद्ध नव्हे तर वाटाघाटींच्या माध्यमातून शांतता हवी आहे. त्यासाठी अमेरिकेसह पाक भागीदार बनले, पण अमेरिकी सैन्याच्या माघारीनंतर संघर्ष चिघळू देण्याचा धोका पत्करणार नाही.
जिवीत-वित्त हानी
अफगाण युद्धामुळे पाकला बरेच नुकसान सोसावे लागले. ७० हजारपेक्षा जास्त पाकिस्तानी मारले गेले. अमेरिकेने २० अब्ज डॉलरची मदत दिली, पण पाक अर्थव्यवस्थेच्या नुकसानीचा आकडा दीडशे अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे, असेही इम्रान यांनी नमूद केले. अमेरिकेला साथ दिल्यामुळे पर्यटन आणि गुंतवणूक घटली, असे त्यांनी म्हटले आहे.
आमच्या तळावरून तरी कसे जिंकणार
आपल्या भूमिकेबाबत इम्रान यांनी महत्त्वाचा मुद्दा प्रश्नातून मांडला. अमेरिकेने पाकमध्ये तळ निर्माण करण्याच्या परिणामकारकतेबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जगाच्या इतिहासातील सर्वाधिक ताकदवान लष्करी यंत्रसामग्री असलेला अमेरिका २० वर्षांत अफगाणिस्तानमध्ये राहून युद्ध जिंकू शकत नसेल तर मग आमच्या देशाच्या तळावरून ते त्यांना कसे शक्य होईल, असा सवाल त्यांनी केला. अफगाणिस्तानवर बाहेरून नियंत्रण मिळविता येत नाही हे इतिहासाने सिद्ध केल्याचे त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.