Omicron in Australia
Omicron in Australia sakal
ग्लोबल

ऑस्ट्रेलियात ओमिक्रॉनचा पहिला बळी

सकाळ वृत्तसेवा

ऑस्ट्रेलियात ओमिक्रॉनचा पहिला बळी

तूर्त नवीन निर्बंध लागू करण्याचा विचार नाही; ब्रिटनमध्ये काही भागात नाईट क्लब बंद

The first death of Omicron in Australia

मेलबॉर्न : ब्रिटन, अमेरिकेपाठोपाठ आता ऑस्ट्रेलियात सोमवारी ओमिक्रॉनच्या पहिल्या बळीची नोंद झाली. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स येथे ओमिक्रॉनबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाची नव्याने लाट सुरू झाली असून रुग्णसंख्येत दररोज वाढ होत चालली आहे. ओमिक्रॉनमुळे ऑस्ट्रेलियाने अद्याप नवीन निर्बंध लागू केलेले नाहीत. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने सध्या नवीन निर्बंध लागू करण्याची गरज नसल्याचे ऑस्ट्रेलियाच्या सरकारने स्पष्ट केले.(Australian government has made it clear that there is no need to impose new restrictions)

ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाचे वय ८० होते आणि त्याला अनेक आजार होते. ऑस्ट्रेलियात तब्बल दोन वर्षांनंतर निर्बंध शिथिल करण्याचा विचार केला जात होता, परंतु आता ओमिक्रॉनमुळे हा विचार पुढे ढकलला आहे. तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी निर्बंधात सूट देत राज्यातंर्गत सीमा खुल्या केल्या. परराज्यात गेलेल्या नागरिकांना विलगीकरणात न राहता घरी जाता येईल, या उद्देशाने सरकारने सीमाबंदीचे नियम मागे घेतले. परंतु आता ओमिक्रॉनची संख्या वाढत असल्याने कोविड नियमांचे पालन काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ओमिक्रॉनमुळे मृत झालेल्या व्यक्तीची फारशी माहिती दिली नाही. परंतु संबंधित व्यक्ती वृद्धाश्रमात राहत होती आणि तेथे ओमिक्रॉनची बाधा झाली. सिडनी रुग्णालयात उपचार घेताना त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. त्याचे लसीकरण झालेले होते, परंतु अन्य आजार असल्याने त्याची प्रतिकार क्षमता खालावली होती. दरम्यान, ऑस्ट्रेलियातील तीन राज्य न्यू साउथ वेल्स, व्हिक्टोरिया आणि क्विंन्सलँडमध्ये गेल्या चोवीस तासात ९१०७ रुग्ण आढळून आले.

ब्रिटनमध्ये कडक निर्बंध लागू

ब्रिटनमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता वेल्स, स्कॉटलँड, उत्तर आयर्लंड येथे रविवारपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठकही बोलावली. सध्या देशात ‘प्लॅन बी’ तंर्गत नियम लागू असून त्यात वर्क फ्रॉम होम, मास्कचे बंधन आणि लसीकरण प्रमाणपत्र या तीन गोष्टी अनिवार्य आहेत. वेल्समध्ये कालपासून नाईट क्लब बंद केले असून पब, रेस्टॉरंट आणि सिनेमागृहात कमाल सहा लोकांना परवानगी दिली जाणार आहे. इनडोअर कार्यक्रमात कमाल ३० जणांना परवानगी असेल तर खुल्या ठिकाणच्या कार्यक्रमांत ५० जणांना उपस्थित राहता येईल. उत्तर आयर्लंडमध्ये देखील नाईट क्लब बंद करण्यात आले आहेत. (Nightclubs have also been closed in Northern Ireland)

सिंगापूरने हटवले दहा देशांवरील निर्बंध

सिंगापूर सरकारने रविवारी दहा आफ्रिकी देशांवर लागू केलेले निर्बंध आज मागे घेतले. परंतु आगामी काळात बाधित रुग्णांची संख्या वाढू शकते, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सिंगापूरमध्ये कामकाजाचा पास, दीर्घकालीन पास आणि स्थानिक रहिवाशांच्या अर्जाची मंजुरी मिळवण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्राची अट घालण्यात आली असून त्याची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपासून केली जाणार आहे.गेल्या चौदा दिवसात बोट्स्वाना, इस्वातिनी, घाना, लेसोथो, मलावी, मोंझाबिक, नामीबिया, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे देशातून आलेल्या नागरिकांना रविवारी मध्यरात्रीपासून चौथ्या श्रेणीत सामील करण्यात आले आहे. यानुसार आफ्रिकेतून सिंगापूरला येणाऱ्या प्रवाशांना ४८ तासांपूर्वी पीसीआरची चाचणी करावी लागेल. तसेच सिंगापूरला आल्यानंतरही चाचणी केली जाईल. नव्या बदलानुसार सिंगापूरला येणाऱ्या प्रवाशांना दहा दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा चाचणी करावी लागेल. तत्पूर्वी या देशांतून सिंगापूरला येण्यास मनाई करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT