Women married with Poor Person Sakal
ग्लोबल

बाजारात महिलेला दिसला गरीब व्यक्ती; घरी घेऊन आली अन् ...

मॉलमध्ये खरेदीसाठी गेलेली एक महिला एका गरीब पुरुषाच्या प्रेमात पडली.

सकाळ डिजिटल टीम

कुणाचं नशिब कधी फळफळेल सांगता येत नाही. एका गरीब पुरुषालाही असाच अनुभव आला. मॉलमध्ये खरेदीसाठी गेलेली एक महिला एका पुरुषाच्या प्रेमात पडली. त्या पुरुषाकडे स्वतःचे घरदेखील नव्हते. या महिलेने त्या बेघर माणसाशी लग्न केले आणि आता त्यांना दोन मुले आहेत. त्या महिलेने नुकतीच ही गोष्ट टिकटॉकवर शेअर केली आहे. या महिलेचे नाव जास्मिन ग्रोगन असून ज्या पुरुषाशी तिनं लग्न केलं त्याचं नाव मॅकॉली मर्ची असं आहे.

ही रोमँटिक प्रेमकथा (Love Story) एका सुपरमार्केटच्या बाहेर सुरू झाली. जास्मिन तिथे खरेदीसाठी गेली होती. तेव्हा तिला एक व्यक्ती दिसला. त्याची अवस्था पाहून जस्मिनला त्याला काही पैसे द्यायचे होते पण त्याने ते घेण्यास नकार दिला. संपूर्ण शॉपिंग दरम्यान ही गोष्ट जास्मिनच्या मनात घोळत राहिली. (The poor man saw the woman in the market; She brought it home and got married)

दरम्यान खरेदी करून ती मॉलमधून बाहेर पडताच त्याच व्यक्तीने तिला सामान उचलण्यात मदत केली. हे पाहून जास्मिन आश्चर्यचकित झाली. जस्मिनकडे इतके सामान होते की ते उचलण्यासाठी तिला दुसऱ्या कोणाची तरी मदत हवी होती. अशा स्थितीत त्या व्यक्तीने नावाने जास्मिनला सामान टॅक्सीत नेण्यात मदत केली. या गोष्टीने तिच्या मनात घर केले.

दोघांची बोलणी कशी वाढली?-

'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, जास्मिन ग्रोगनने तिच्या टिकटॉक व्हिडिओमध्ये सांगितले की, जेव्हा मी खूप सामान घेऊन मॉलच्या बाहेर जात होते, तेव्हा मॅकॉलीने मला मदत केली. त्याबदल्यात मी त्याला जेवायला विचारलं. मॅकॉलीनेही सहमती दर्शविली. रात्रीच्या जेवणादरम्यान त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल दीर्घ संवाद साधला. त्यानंतर जास्मिननं त्याला एक छोटा फोन दिला जेणेकरून ती त्याच्या संपर्कात राहू शकेल.

इतकेच नाही तर जास्मिनने बेघर मॅकॉलीसाठी हॉटेलमध्ये एक रूमही बुक केली. घरी आल्यावर ती रात्रभर त्याचाच विचार करत राहिली. दोघेही मेसेज करून बोलू लागले. काही दिवसांनी दोघं पुन्हा जेवणासाठी भेटले. दुपारच्या जेवणानंतर जास्मिननेही मॅकॉलीला काही कपडे दिले आणि तिच्या घरात एक खोली दिली.

काही दिवसांतच जास्मिनला वाटले की मॅकॉली आपला योग्य जोडीदार होईल. एके दिवशी जस्मिनने आपलं प्रेम व्यक्त केले, मॅकॉलीनेही हो म्हटले आणि तेव्हापासून दोघेही एकत्र आहेत. मॅकॉलेने वाढलेली दाढी काढली, छान कपडे घालायला सुरुवात केली आणि काही दिवसात त्याला नोकरी मिळाली. आता तो एक सामान्य जीवन जगू लागला. सध्या या जोडप्याला दोन मुले असून ते सुखी जीवन जगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

Marathwada News : “साहेब, आम्हाला पण भीती वाटते!” पीक वाचवायचं की जीव; निल्लोड परिसरात अंधारात गहू भरणी करताना शेतकरी धोक्यात!

Sanjay Khodke Accident : राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांचा अपघात; पक्षाच्या बैठकीला दुचाकीने जात असताना कारने दिली धडक!

Alcohol Risk : दारू पिऊन झाल्यानंतर चुकूनही खावू नका 'हे' 3 पदार्थ; नाहीतर हँगओव्हर होईल डबल अन् लवकरच गमवाल जीव

Karad Kidnapping Case : गाडी अडवली, मारहाण केली अन् उचलून नेलं; कऱ्हाडजवळ व्यापाऱ्याचे सिनेमा स्टाईल अपहरण!

SCROLL FOR NEXT