trupmh 
ग्लोबल

राष्ट्रपतीपदाची निवडणूक हरल्यास काय करणार? ट्रम्पनी दिलं उत्तर

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन-  डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आणि विरोधक जो बायडेन यांनी ट्रम्प  निवडणूक हरल्यास ते सहजासहसी व्हाईट हाऊस सोडणार नाहीत असं म्हटलं होतं. यावर ट्रम्प यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यास मी अन्य गोष्टी करण्याकडे लक्ष देईन, असं उत्तर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं आहे.

मी जर जिंकलो नाही तर, जिंकलो नाही. मी पुढे जाईन आणि अन्य गोष्टी करेन, असं ट्रम्प म्हणाले आहेत. ट्रम्प फॉक्स न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्य यांच्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाक युद्ध सुरु झाले आहे.  दोघांनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. 

जो बायडेन अनेक राष्ट्रीय पोलमध्ये आघाडीवर असल्याचं दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प जिंकून येण्यासाठी काहीही करु शकतात. शिवाय जर त्यांचा पराभव झाला तर ते आपलं ऑफिस सोडणार नाहीत, असा आरोप बायडेन यांनी केला होता. पण माझा अमेरिकी सैन्यावर पूर्ण विश्वास आहे. ट्रम्प ऑफिस सोडणार नसतील तर आपले सैन्यच त्यांना व्हाईट हाऊसच्या बाहेर काढेल, अशी पुष्टीही त्यांनी जोडली होती. त्यांचे हे वक्तव्य ट्रम्प यांना चांगलंच झोंबलं आहे.

ट्रम्प यांनी निवडणुकीचा निकाल मान्य करणार असल्याचं म्हटलं असलं तरी त्यांनी स्पष्टपणे काही म्हटलं नाही. ट्रम्प यांचे प्रचार मोहिम प्रवक्ते टीम मुर्ताफ म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प निकाल स्वीकारतील. मात्र, डेमोक्रॅटिक मतदान प्रक्रियेत घोळ घालू शकतात. ते जास्तीच्या मेल मतदानाचा वापर करतील.   देशात सुरु असेलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मेल पद्धतीने केले जाणारे मतदान वाढण्याची शक्यता आहे. प्राथमिक निवडणुच्या वेळीही काही ठिकाणी मेल-मतदान पद्धतीत गोंधळ उडाल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन समोरासमोर असणार आहेत. ट्रम्प यांना पुन्हा एकदा अध्यक्ष होण्याची संधी आहे. मात्र, यावेळी त्यांच्यासमोर अनेक संकटे आहेत. कोरोना महामारीला रोखण्यात  आलेले अपयश आणि वर्णभेदविरोधी उसळले आंदोलन यामुळे त्यांची डोकेदुखी वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cow E-attendance: गायींनाही आता ई-अटेंडन्स द्यावा लागणार! एक विशेष मायक्रोचिप विकसित; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi Horoscope Prediction : आजपासून फक्त 24 दिवसांमध्ये बदलणार 'या' राशींचं नशीब ! बक्कळ श्रीमंतीचा योग

वाहतुकीचा ‘नवा अध्याय’ लिहिला जाणार! गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे कोंडीतून दिलासा मिळणार! नवी मुंबई काही मिनिटांत गाठता येणार!

November 2025 Horoscope : नव्या आठवड्यात 'या' 3 राशींच्या लोकांचा होणार फायदाच फायदा..घरी येणार पैसा-गुडलक, तुमची रास आहे का?

Latest Marathi News Update : ISRO कडून भारतीय संवाद उपग्रह CMS-03 चे यशस्वी प्रक्षेपण

SCROLL FOR NEXT