UK-PM-Boris-Johnson 
ग्लोबल

Fight with Corona : ब्रिटीश पंतप्रधानांनी कोरोनाला हरविले; हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज!

वृत्तसंस्था

लंडन : कोरोना व्हायरसची लागण झाल्याने गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना अखेर रविवारी (ता.१२) डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना व्हायरसचा यशस्वी सामना केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्याने दिली. 

कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने ५५ वर्षीय ब्रिटीश पंतप्रधान बोरीस यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. जवळपास एक आठवडाभर बोरिस यांच्यावर सेंट थॉमस रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांना आयसीयूमध्येही ठेवण्यात आले होते. 

बोरिस जॉन्सन यांनी आपला जीव वाचविल्याबद्दल राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस) मधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले. प्रकृतीत सुधारणा जाणविल्यानंतर शनिवारी (ता.११) त्यांना आयसीयूमधून बाहेर काढण्यात आले. आयसीयूतून बाहेर आल्यानंतरच त्यांनी पहिल्या जाहीर निवेदनात 'जीव वाचविल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,' असे म्हटले होते. 

पंतप्रधान आपल्या कार्यालयात कधी दाखल होतील, असे विचारले असता गृहमंत्री प्रीती पटेल यांनी सांगितले की, 'पंतप्रधानांना पूर्णपणे बरे होण्यास अजून काही वेळ आरामाची गरज आहे. त्यानंतरच ते कामावर रुजू होतील.' ब्रिटनमध्ये आणखी ९१७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने तेथील मृतांचा आकडा ९८७५ वर पोहोचला आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, ब्रिटनमधील सुमारे ८० हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 

दरम्यान, पंतप्रधान बोरिस यांनी ब्रिटनवासियांना ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच स्वत:चे प्राण वाचवायचे असतील, तर घरीच राहा, असे आवाहनही केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT