Joe Biden टिम ई सकाळ
ग्लोबल

रशियानं हल्ला केल्यास युक्रेनला मदत करणार; अमेरिकन संसदेत ठराव मंजूर

युक्रेनच्या समर्थनासाठी अमेरिकेच्या सिनेटने एक ठराव मंजूर केलाय

सकाळ डिजिटल टीम

गुरुवारी रात्री रशियाच्या (Russia) संभाव्य आक्रमणाविरुद्ध स्वतंत्र (Independent) आणि लोकशाहीवादी (Democratic) युक्रेनच्या (Ukraine) समर्थनासाठी अमेरिकेच्या सिनेटने एक ठराव मंजूर केलाय. युक्रेनचे संरक्षण बळकट करण्यासाठी आणि सुरक्षा मदत देण्यासाठी राजकीय आणि लष्करी सहाय्य देऊन युक्रेनला पाठिंबा देण्याचे या ठरावात म्हटले आहे

युक्रेनवर आक्रमण झाल्यास युरोपमधील शांतता प्रस्थापीत करण्यासाठी रशियाला महत्त्वपूर्ण किंमत मोजावी लागेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी या ठरावात म्हटले आहे. ब्रिटन आणि अमेरिकेनं रशियाकडे त्यांनी सैन्य मागे घेतल्याचे पुरावे देण्यास सांगितलं आहे. तर एका बाजुला रशियाने पूल उभारल्याचे फोटोही समोर आले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या साऱ्या प्रकरणावर आपलं मत मांडलं आहे. त्यांनी म्हटलंय की, रशियाकडून युक्रेनवर 'पुढील काही दिवसांत' हल्ला होणं शक्य आहे. मात्र, पुतीन यांना फोन करण्याची सध्यातरी 'कोणतीही योजना नाही', असं जो बायडेन यांनी म्हटलंय. तर रशिया सैन्य माघारी घेत असल्याचा कोणताही पुरावा अद्याप दिसत नसल्याने आपण त्यांच्यावर विश्‍वास ठेवण्याची घाई करू नये, असे आवाहन ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांनी आज केले. अमेरिकेनेही आज पुन्हा एकदा रशियाकडून आक्रमण होण्याचा धोका व्यक्त केला आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यात तणावाचं वातावऱण आहे. यामुळे जगातील अनेक देशांची चिंता वाढली आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी रशिया-युक्रेन यांच्यात युद्धाची ठिणगी पेटल्यास त्याचे परिणाम भयंकर असतील असं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT