baby esakal
ग्लोबल

Viral Video : आईने वापरली ट्रिक; रडणाऱ्या बाळाच्या चेहऱ्यावर आले लगेच हसू

असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाला.

सकाळ डिजिटल टीम

असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाला.

प्रसिद्ध गायक एपी धिल्लन यांचं गाजलेलं पंजाबी गाणं 'एक्सक्यूज'या गाण्याच वेड थांबायचं नाव घेत नाहीये. या गाण्याला देशभरात खूप पसंती मिळत आहे. केवळ तरुणच नाही तर लहान मुलेही या गाण्याला पसंती देत आहेत. विशेषतः दिल्लीकरांच्या (Delhi) आवडत्या गाण्यांपैकी हे गाणं आहे. रडणाऱ्या मुलांना गप्प करण्याचा प्रयत्नही पालक पंजाबी गाण्यातून करत आहेत. असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये (Viral Video) पाहायला मिळाला. रडणाऱ्या मुलांना शांत करण्यासाठी हे गाणं जादूसारखं काम करतंय.

इन्स्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तविशी नावाची एक गोंडस मुलगी रडताना दिसत आहे, तर तिची आई तिला गप्प बसावे म्हणून झोळीत घालून तिला मागे-पुढे ढकलत आहे. आई एपी ढिल्लन यांचं 'एक्सक्यूज' गाणं वाजवताच त्या बाळाच रडणं बंद होतं.'एक्सक्यूज'ची सुरुवातीची धून लहान मुलगी ऐकते. ती गप्प बसते आणि फक्त गाण्याच्या तालावर लक्ष केंद्रित करते. काही सेकंदानंतर बाळाचा मूड बदलतो. व्हिडिओमध्ये पाहू शकता की बाळाच्या चेहऱ्यावरील हास्य वाढलेले दिसून येत आहे.Viral Video

मुलीची आई शैलजा यांनी 'द मॅजिक ऑफ एपी ढिल्लन' असा मजकूर असलेल्या 'whatshelysayz' या हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट केला होता. ती दिल्लीची मेकअप ब्लॉगर आहे. तिने या पोस्टला कॅप्शन दिले आहे की, "एपी ढिल्लनचे संगीत आपल्या मुलावर उत्तम काम करते." त्याच्या एका इंस्टाग्राम मित्राने देखील व्हिडिओवर कमेंट केली की, ही युक्ती त्याच्या मुलावरही काम करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT