ग्लोबल

जागतिक नेत्यांमध्ये पडले 90 टक्के; तरीही मोदींचा रिझल्ट फेल

विनायक होगाडे

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. (CoronaVirus) देशात सध्या विदारक अशी परिस्थिती निर्माण झाली असून याबाबत सध्या जगभरातच चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक जागतिक माध्यमांनी भारतातील या गंभीर परिस्थितीवरुन टीका केली आहे तसेच काळजी देखील व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) नेतृत्वाखाली एकीकडे आत्मनिर्भर बनण्याची वल्गना करणारा देश सध्या विश्वनिर्भर बनलाय का? असा सवाल देखील उपस्थित करण्यात येतो आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात पंतप्रधान सफशेल अयशस्वी ठरले असल्याच्या बातम्या जागतिक माध्यमांमध्ये प्रसारित होत आहेत. (Who Did Worst PM Modi Gets 90 percent Votes in Poll on COVID Response among other presidents)

यासंदर्भातच अमेरिकेतील 'द कॉन्व्हर्सेशन' या न्यूज वेबसाईटने ट्विटरवर अलिकडेच एक महत्त्वाचा पोल घेतला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील इतर सर्व नेत्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती हाताळण्यामध्ये अयशस्वी ठरल्याचा निष्कर्ष या पोलमधून समोर आला आहे. 'Who did the worst?' अर्थात सर्वांत वाईट कामगिरी कुणी केली? याबाबतच्या पोलमध्ये नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक मते मिळाली आहे. या पोलमध्ये जवळपास 75 हजारहून अधिक लोकांनी आपली मते नोंदवली आहेत. 75,450 लोकांपैकी जवळपास 90 टक्क्यांहून अधिक मते भारताचे पंतप्रधान मोदींना मिळाली आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देखील मोदींनी मागे टाकलं आहे. यामध्ये ट्रम्प यांना 4.9 टक्के मते मिळाली आहेत. तर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सनारो यांना 3.6 टक्के तर मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष अ‍ॅन्ड्रेस मॅन्युअल लोपेझ ओब्राडोर यांना 1.3 टक्के मते मिळाली आहेत.

भारतामध्ये अलिकडेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये पंतप्रधान, गृहमंत्र्यांसमवेत अनेकांनी कोरोनाचं संकट विसरुन लाखोंच्या प्रचारसभा घेतल्या. एकीकडे 'कोई ढिलाई नहीं' म्हणणारे पंतप्रधान दुसरीकडे प्रचारसभेत जमलेल्या गर्दीचं गर्दीबद्दल कौतुक करताना दिसून आले होते. तसेच त्यानंतर घेतलेला कुंभमेळ्याचा निर्णय देखील अंगलट आलेला दिसून आला.

इंडियाना विद्यापीठाचे प्राध्यापक सुमित गांगुली यांनी भारताच्या कोरोना परिस्थितीबाबत लिहलं होतं. एप्रिल महिन्यातील विधानसभा निवडणुका, पंतप्रधानांच्या प्रचारसभा तसेच कुंभमेळ्याचा संदर्भ, या काळात देशातील लसीकरणाची गती कमी होती, असं त्यांनी म्हटलं होतं. भारत सध्या जागतिक महामारीचा नवीन केंद्रबिंदू बनला आहे. तसेच मे 2021 पर्यंत दररोज सुमारे 400,000 नवीन रुग्ण नोंदविले जात आहेत. रूग्णालयात रुग्ण मृत्यूमुखी पडत आहेत कारण डॉक्टरांकडे रुग्णांना देण्याकरिता ऑक्सिजन नाही आणि रेमडेसिव्हिरसारखी जीव वाचवणारी औषधे देखील उपलब्ध नाहीयेत, असं त्यांनी म्हटलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT