woman digs herself out grave after beaten at ukraine 
ग्लोबल

महिलेला जिवंत दफन केलं पण चालत घरी आली...

वृत्तसंस्था

यूक्रेन: दोन दारुडे महिलेच्या घरात घुसले आणि महिलेला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर महिलेला कब्रस्तानात घेऊन गेले आणि जिवंत दफन केले. महिलेचा मृत्यू झाल्याचे समजून ते निघून गेले. यानंतर महिलेने स्वतःची सुटका करून घेत चालत घरी आली. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नीना रुडचेन्को (वय 57, रा. मरियान्स्के) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. नीनाने प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, शेजारी राहणाऱया दोघा दारुड्यांनी घरात घुसून बेदम मारहाण केली. यामुळे मला मोठी दुखापत झाली होती. दोन तास ते मला मारहाण करत होते. यानंतर मी बेशुद्ध पडले. माझ्या चेहऱयावर पाणी टाकून मला शुद्धीत आणले आणि मला कब्रस्तानात घेऊन गेले. मला थडगे खोदायला लावले आणि मला दफन केले. पण, थडग्यात पडल्यानंतर मी चेहरा झाकून घेतला. यामुळे हवा येण्यास मदत झाली. मला दफन केल्यानंतर ते मोठमोठ्याने हसत होते. काही वेळानंतर माझा मृत्यू झाल्याचे समजून ते निघून गेले. यानंतर मी सुटका केली आणि घरी आले. बहिणीने मला रुग्णालयात दाखल केले.'

डॉक्टर ओलेक्संडर क्लेम्चेक यांनी सांगितले की, नीना यांच्या डोक्याला जबर मारहाण झाली होती. जबडा आणि नाक पूर्णपणे तुटले होते. महिलेवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT