donates 50 pints-of breast-milk 
ग्लोबल

आईची माया! पोटच्या बाळाचा मृत्यू, तरीही दूधाचे दान करून दिले अनेकांना जीवनदान

अमेरिकेत राहणारी सारा लॅम्पले या आईने अनेकांना प्रेरणा दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

बाळाच्या जन्मादरम्यान मृत मुलाला जन्म दिलेल्या महिलेने आपले 50 पिंट दूध (Milk) आजारी बाळांना दान केले आहे. अमेरिकेत राहणारी सारा लॅम्पले (34) असे मुलीचे नाव आहे. या महिलेला गरोदरपणाच्या (Pregnancy) 38 व्या आठवड्यात खूप रक्तस्त्राव झाला.प्लेसेंटल ऍब्प्रेशनचा अनुभव घेतल्यानंतर तिची प्रकृती गंभीर होती. तिची तब्येत अत्यंत खराब झाली होती. मृत्यूला हात लावून ती परत आली. पण दरम्यान तीच्या मुलाचा मृत्यू झाला.

गर्भात बाळाच्या स्थितीमुळे रक्ताच्या गुठळ्या तिच्या शरीराच्या इतर भागात जाण्यापासून रोखल्या गेल्याने साराचा जीव वाचला, असे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेला तीन महिने झाले आहेत. त्यानंतर आता सारा आई आणि आजारी बाळांना मदत करते. मेट्रो यूकेच्या अहवालानुसार, साराने, अमेरिकेतील मदर्स मिल्क बँक ऑफ अलाबामाला 800 औंसहून अधिक आईचे दूध दान केले आहे

breast milk

याबाबत सारा म्हणते, मुलाला जन्म दिल्यानंतर मला प्रसुतीनंतर निर्माण होणाऱ्या गोष्टींना सामोरे जावे लागले. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. दूध फेकून देण्याचा विचार हा अत्यंत वाईट होता. पण मग तिने हे दूध मिल्क बॅंकला विकले. साराला तिच्या नवरा आणि तिन मुलांनी यासाठी समर्थन दिले. साराच्या मुलांनी जेव्हा विचारले, इतके दूध कोणासाठी आहे. त्यांना सांगितल्यावर त्यांना फार छान वाटले. ते म्हणाले, तू चांगले काम करते आहेस. साराने ज्यांनी मुले गमावली अशा आयांशी संपर्क केला. अशा अनेक आयांनी आपली मुले अशापद्धतीने का होईना लक्षात राहावीत म्हणून दूध दान केले होते. हे कळल्यानंतर माझ्यातला उत्साह दुणावला.

स्तनपान

साराने आता ब्लॉग आणि सोशल मीडिया पेजवर तिच्या प्रवासाची माहिती दिली आहे. अशा अनुभवातून गेलेल्या अनेक महिलांचे तिने लक्ष वेधले आहे. पण सारा आणि कुटूंबियांनी अजूनही आपल्या बाळाबरोबर पोटात घालवलेला ९ महिन्यांचा काळ जपला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT