World Press Freedom Day 
ग्लोबल

World Press Freedom Day : "पत्रकारांना ताब्यात घेणे आणि तुरुंगात टाकणे थांबवा" ; संयुक्त राष्ट्र प्रमुखांचे आवाहन

Sandip Kapde

World Press Freedom Day : युनेस्कोने संयुक्त राष्ट्रांच्या जनरल असेंब्ली हॉलमध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी संबोधित केले. जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गुटेरेस यांनी पत्रकारांना ताब्यात घेणे आणि तुरंगात टाकणे थांबवा, असे आवाहन केले.

गुटेरेस म्हणाले, जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिनानिमित्त जगाने एक आवाजात बोलले पाहिजे. पत्रकारांना त्यांच्या कामासाठी ताब्यात घेणे आणि तुरुंगात टाकणे थांबवा. जगाच्या कानाकोपऱ्यात माध्यमांवर हल्ले होत आहेत. हे हल्ले थांबवायला पाहीजे.

वृत्तपत्र स्वातंत्र्य हा लोकशाही आणि न्यायाचा पाया आहे. मात्र स्वातंत्र्यावर हल्ला होत आहे. विज्ञान आणि षड्यंत्र, तथ्य आणि काल्पनिक यातील रेषा पुसट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. चुकीची माहिती आणि द्वेषयुक्त भाषणामुळे सत्याला धोका आहे, असे देखील गुटेरेस यांनी म्हटले आहे.

पत्रकार आणि प्रसारमाध्यमांवरील हल्ले मागील वर्षांच्या तुलनेत ५० टक्क्यांनी वाढले आहेत. याशिवाय, तीन चतुर्थांश महिला पत्रकारांनी ऑनलाइन हिंसाचाराचा अनुभव घेतला आहे. त्यांचा सतत छळ केला जातो, धमकावले जाते आणि ताब्यात घेतले जाते. तुरुंगातही टाकले, अशी माहिती गुटेरेस यांनी दिली.

युनेस्कोचे महासंचालक ऑड्रे अझौले म्हणाले, जगभरातील शेकडो पत्रकारांवर हल्ले करण्यात आले आणि त्यांना फक्त त्यांच्या कामासाठी तुरुंगात टाकण्यात आले. हे अस्वीकार्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate: शेअर बाजारात जोरदार वाढ; तर सोन्या-चांदीचे भाव घसरले, जाणून घ्या आजचा भाव

Vi Recharge : फक्त 1 रुपयांत जिंका 4999 वाला रिचार्ज; 'या' बड्या कंपनीची जबरदस्त ऑफर, यूजर्सचा फायदाच फायदा

Chhagan Bhujbal : मराठा समाज ओबीसीत येऊ शकत नाही; छगन भुजबळांचा स्पष्ट इशारा

Kolhapur Dahihandi: ‘नृसिंह गोविंदा’ तीन लाखांचे मानकरी; सात मनोरे रचून फोडली धनंजय महाडिक युवा शक्तीची दहीहंडी

Ganesh Festival 2025 : पूजा साहित्य आणि फुलांच्या खरेदीसाठी पुण्यातील बाजारपेठेत गर्दी

SCROLL FOR NEXT