National Flag
National Flag  Sakal
ग्लोबल

National Flags: जगातल्या ५ देशांच्या राष्ट्रध्वजांवर आहेत हिंदू-बौद्ध धार्मिक चिन्हे; कोणते आहेत हे देश?

वैष्णवी कारंजकर

जगातील बहुतेक देशांच्या राष्ट्रध्वजांवर धार्मिक चिन्हं आहेत. बहुतेक देशांच्या ध्वजांवर ख्रिश्चन धर्माची चिन्हं आहेत, त्यानंतर मुस्लिम देश दुसऱ्या क्रमांकावर आहेत, ज्यांच्या ध्वजांवर मुस्लिम चिन्हं आहेत. जगात असे ५ देश आहेत ज्यांच्या राष्ट्रध्वजांवर हिंदू किंवा बौद्ध धार्मिक चिन्हं आहेत.

पीयू रिसर्च अॅनालिसिसच्या अहवालात असं म्हटलं आहे की जगातील ६४ देशांच्या राष्ट्रीय ध्वजांवर धार्मिक चिन्हं आहेत आणि अर्ध्याहून अधिक देशांच्या ध्वजांवर ख्रिश्चन चिन्हं आहेत. यापैकी एक तृतीयांश देशांमध्ये इस्लामिक धार्मिक चिन्हं आहेत, जी त्यांच्या ध्वजांवर स्पष्टपणे दिसतात.

असे ३१ देश आहेत, जे युरोप, आशिया, पॅसिफिक आणि अमेरिकेतले आहेत, जिथं राष्ट्रीय ध्वजांमध्ये ख्रिश्चन चिन्हं आहेत. ब्रिटनचा ध्वज सेंट जॉर्ज, सेंट पॅट्रिक आणि सेंट अँड्र्यू यांच्या क्रॉस दाखवतो. काही कॉमनवेल्थ देशांच्या ध्वजांवरही याचा परिणाम झालेला दिसतो. जसं की फिजी, तुवालु, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्पेन, ग्रीस, नॉर्वे आणि डोमिनियन रिपब्लिक वगैरे.

जर तुम्ही ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, डोमिनियन रिपब्लिक, फिजी, फिनलंड, जॉर्जिया, ग्रीस, लेचस्टीन, माल्टा, मोल्दोव्हा, आयर्लंड, स्लोव्हेनिया, स्वीडन आणि स्वित्झर्लंडचे ध्वज पाहिले तर त्या सर्वांमध्ये येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आलेला क्रॉस आहे. ख्रिश्चन धर्माचे सर्वात पवित्र प्रतीक बनलं.

२१ देशांमध्ये इस्लामिक चिन्हं आहेत, हे देश आफ्रिका, आशिया, मध्य पूर्व आशिया पॅसिफिक प्रदेशात आहेत. बहरीनच्या राष्ट्रीय ध्वजातले पाच पांढरे त्रिकोण इस्लामच्या पाच स्तंभांचं प्रतिनिधित्व करतात. अल्जेरिया, तुर्की, ब्रुनेई आणि उझबेकिस्तानच्या ध्वजांमध्ये इस्लामिक तारे आणि चंद्रकोर ही धार्मिक चिन्हं आहेत.

सिंगापूरच्या ध्वजावर अर्धा चंद्र आणि तारे असले तरी ते धार्मिक गोष्टींचं प्रतिनिधित्व करत नाहीत. त्याचा अर्धा चंद्र तरुण राष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो, तर ५ तारे लोकशाही, शांतता, विकास, न्याय आणि समानता ही पाच तत्त्वे सांगतात.

मुस्लिम देशांमध्ये, बहुतेक ध्वजांवर चंद्र आणि तारे आहेत तर काहींवर कुराणच्या आयतीही आहेत. इराण, इराक, अफगाणिस्तान, ब्रुनेई, मालदीव, पाकिस्तान, सौदी अरेबियाच्या ध्वजांवर जास्त हिरवे पट्टे आणि चंद्र तारे आहेत.

जगात असे ५ देश आहेत जे आपल्या राष्ट्रध्वजात हिंदू किंवा बौद्ध चिन्हं ठेवतात.

कंबोडियाच्या ध्वजात अंगकोर वाटचं मंदिर आहे, जे हिंदू आणि बौद्ध धर्माशी संबंधित आहे. नेपाळच्या ध्वजाचे शिखर आणि चिन्हही हिंदू आणि बौद्ध धार्मिक चिन्हं दर्शवतात. भारतीय ध्वजाच्या मध्यभागी असलेल्या निळ्या चक्राचा हिंदू आणि बौद्ध दोघांसाठी प्रतीकात्मक अर्थ आहे. भूतानचा ड्रॅगन आणि श्रीलंकेचा तलवार घेऊन जाणारा सिंह हे बौद्ध शिल्प शैली आणि धार्मिक चिन्हांशी संबंधित आहेत.

इस्रायल हा एकमेव देश आहे ज्याच्या राष्ट्रीय ध्वजावर ज्यू चिन्ह आहे, एक कोरलेला तारा आणि ज्यू परंपरा आणि त्यांची प्रार्थना शाल दर्शवणारे पांढरे आणि निळे पट्टे आहेत. जपानच्या ध्वजावर उगवता सूर्य आहे, जो शिंटोइझमच्या आध्यात्मिकतेमुळे तसंच जपानच्या पूर्वीच्या राजेशाहीचं प्रतिनिधित्व करतो. अमेरिकेच्या राष्ट्रध्वजावर कोणतेही धार्मिक चिन्ह नाही. अमेरिकेतील अनेक राज्यांच्या ध्वजांवर निश्चितपणे धार्मिक चिन्हे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

ब्रेकिंग! ‘आरटीई’ प्रवेशाला मंगळवारपर्यंत मुदतवाढ; शिक्षण संचालकांचे आदेश; आता मुदतवाढ नसल्याचेही स्पष्टीकरण

Nagpur Temp : नागपूरमध्ये नोंद झालेलं 56 डिग्री तापमान होतं चुकीचं! हवामान विभागाला का द्यावं लागलं स्पष्टीकरण?

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

SCROLL FOR NEXT