Sharad-Pawar-Sanjay-Raut e sakal
Goa Assembly Election

गोव्यात राष्ट्रवादी-शिवसेनेचा सुपडा साफ, सर्व उमेदवार पिछाडीवर

सकाळ डिजिटल टीम

Goa Assembly Election 2022 : गोव्यात सुरू असणाऱ्या ४० जागांच्या महासंग्रामात यंदा शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत लढत होते. गोव्यात शरद पवार, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनीही तळ ठोकला होता. गोव्यातील पारंपारिक राजकारण, कोकणी माणूस आणि बाळासाहेब ठाकरे यांचे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री बांदोडकरांसोबत असलेले संबंध अधोरेखित करत शिवसेना मैदानात उतरली होती. यंदाच्या निवडणुकीत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. (NCP and Shivsena lost seats in Goa Election 2022)

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही प्रचारासाठी दाखल झाल्या होत्या. सेनेच्या प्रचारासाठी कोकणातील नेत्यांनीही उपस्थिती लावली. मात्र, अजून शिवसेनेला गोव्यात खातं उघडता आलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला २०१७ च्या निवडणुकीत एक आमदार निवडून आणण्यात यश आलं होतं. बानावली मतदारसंघातून चर्चिल आलेमाओ राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. मात्र, यंदा त्यांनाही पराभवाचं तोंड पाहावं लागणार असल्याचं चित्र आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवार आणि संजय राऊत यांनी महाराष्ट्राप्रमाणेच काँग्रेससोबत आघाडी करत महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसने प्रत्युत्तर न दिल्याने दोन्ही पक्षांनी सोबत लढण्याचा निर्णय घेतला. अखेर दुपारी १२ पर्यंत दोन्ही पक्षांचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही.

यंदा गोव्यात काँग्रेस आणि भाजपात पुन्हा टक्कर झाल्याचं पाहायला मिळतंय. २०१७ च्या निवडणुकीत सर्वाधिक जागा निवडून आणल्यानंतरही काँग्रेसला विरोधात बसावं लागलं होतं. त्यामुळे यंदा सत्ता स्थापनासाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसचे नेते पी.चिदंबरम यांच्यासह बडे नेते गोव्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT