Diet Human life esakal
health-fitness-wellness

आयुर्वेदिक काढा पिल्यानंतर बाप-लेकाचा मृत्यू; तुमचा 'हा' आहार देखील देतोय मृत्यूला निमंत्रण, वेळीच घ्या काळजी

आहार, विहार आणि विचारांना मानवी जीवनात (Human life) अनन्‍यसाधारण महत्त्‍व आहे.

सकाळ डिजिटल टीम

चुकीचा आहार गंभीर आजारांची नांदी ठरू शकते. आजचा आहार उद्याचे आरोग्य घडवत अथवा बिघडवत असतो.

Health Care News : आहार, विहार आणि विचारांना मानवी जीवनात (Human life) अनन्‍यसाधारण महत्त्‍व आहे. या त्रिसूत्रीत बदल झाल्‍यास त्‍याचे परिणाम कळत-नकळत आपल्‍या अंतर्बाह्य शरीरावर आणि त्‍याच्‍या जडणघडणीवर होत असतात. अलीकडच्‍या काळात विरुद्ध आहार घेण्‍याच्‍या प्रमाणात वाढ होत आहे.

याविरुद्ध अन्नामुळे शरीरांतर्गत गुंतागुंतीच्‍या क्रियाप्रक्रिया गतिमान होत आहेत. या गुंतागुंतीच्‍या क्रियाप्रक्रिया टाळत शरीर, मन निरोगी, निकोप राहण्‍यासाठी सर्वांनीच विरुद्ध आहार टाळणे आवश्‍‍यक आहे. मानवी जीवनाच्‍या उत्‍क्रांतीत आहाराला अत्‍यंत महत्त्‍व आहे.

प्रत्‍येक टप्‍प्‍यावर आहार प्रक्रियेत बदल होत गेले. ऋतुमानानुसार आहारपद्धती कशी हवी, याचे ठोकताळे आपल्‍या पूर्वजांनी तयार केले. त्‍यानुसार प्रत्‍येकाचे जीवनमान सुरू होते. जीवनात गती आली आणि आहारपद्धती सम आणि विरुद्ध अशा पद्धतीत विभागली गेली. कोणता आहार पोषक तर कोणता आहार विरुद्ध आहे, याचे कोणतेही स्‍पष्‍ट ज्ञान अनेकांना नसल्‍याने त्‍यातून अनेक दुर्घटना घडत असतात.

या दुर्घटना घडल्‍यानंतर पूर्वापार चालत आलेल्‍या आहारपद्धतीच्‍या अनुषंगाने पुन्‍हा चर्चेच्‍या फेऱ्या झडतात. फलटण येथील दुर्घटनेत जेवणानंतर काढा पिल्‍यानंतर पिता-पुत्राचा मृत्यू झाल्‍याचे समोर आले. त्‍या पिता-पुत्रांनी एकाच दिवशी पुरणपोळी आणि मांसाहार घेतल्‍याची माहितीही उपलब्‍ध होत आहे. त्‍यांच्‍या मृत्‍यूच्‍या नेमक्‍या कारणाचा शोध घेण्‍याचे काम वैद्यकीय पातळीवर सुरू आहे.

या घटनेच्‍या किंवा त्यानंतरच्या चर्चांच्‍या निमित्ताने विरुद्ध आहाराच्‍या साथीने सुरू झालेली जीवनशैली पुन्‍हा समोर आली. आपण जे खातो, त्‍यातील प्रत्‍येक अन्नकणाचा परिणाम आरोग्यावर होतो. पोटात जाणारे अन्न सकस आणि दर्जेदार असेल, तर त्‍यातून आवश्‍‍यक ऊर्जा शरीराला मिळते. चांगले अन्न अमृतासमान तर विरुद्ध आहार विषासमान असल्‍याचे अनुभवांती सिद्ध झाले आहे. त्‍याविषयी प्रत्‍येकाने सजग राहणे गरजेचे आहे.

आहाराचे विषात रूपांतर

काय खावे, यापेक्षा काय खाऊ नये, याची प्रत्‍येकाने काळजी घ्यायला हवी. प्रत्येक पदार्थाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. आयुर्वेदानुसार काही विरोधी पदार्थ एकत्रित खाल्ल्यास त्याचे आरोग्यावर परिणाम होऊ शकतात. काही विरुद्ध अन्नाचे वाईट परिणाम तत्काळ तर काहींचे हळुवारपणे; पण निश्चित स्वरूपात दिसतात. अपवादात्मक स्थितीत अशा आहाराचे विषात रूपांतर होऊन जिवास धोका होऊ शकतो.

हे लक्षात ठेवा..

  • मांस, मच्‍छी खाण्‍यापूर्वी किंवा नंतर दुग्‍धजन्‍य पदार्थ टाळा.

  • मांसाहारासोबत डाळींचे पदार्थ खाऊ नका.

  • जेवणासोबत कोल्ड्रिंक्स पिणे टाळा.

  • दुधासोबत आंबट पदार्थ खाऊ नका.

  • जास्‍त गरम पाणी, दूध, काढ्यामध्‍ये मध टाकून त्‍याचे सेवन करणे धोकादायक.

  • दूध-फळांचे मिश्रण हानिकारक.

  • मिसळ, रगडा, चाट खाताना दही टाळा.

  • कारले, लिंबू, मीठ एकत्रित खाऊ नका.

  • एकाचवेळी थंड आणि गरम पदार्थांचे सेवन करू नका.

चुकीचा आहार गंभीर आजारांची नांदी ठरू शकते. आजचा आहार उद्याचे आरोग्य घडवत अथवा बिघडवत असतो. आहार औषधासारखा घेतला नाही, तर पुढे औषधं हाच आहार होऊ लागतो. हे टाळण्यासाठी आहाराकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या.

-सुनीता वैराट, आहारतज्‍ज्ञ, सातारा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT