paneer egg for weight loss esakal
health-fitness-wellness

अंड की पनीर ! वजन कमी करण्यासाठी प्रोटीनचा सर्वोत्तम पर्याय कोणता? जाणून घ्या

तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा स्नायू मजबूत करायचे असतील तर शरीरासाठी प्रथिने खूप आवश्यक आहेत

सकाळ डिजिटल टीम

तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा स्नायू मजबूत करायचे असतील तर शरीरासाठी प्रथिने खूप आवश्यक आहेत. ही प्रथिनं (Protein) कुठून मिळतील? काय खाणं (Food) जास्त चांगलं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. त्यात तुम्हाला जर : 'पनीर की अंड' असा पर्याय मिळाला तर! शाकाहारी लोकांसाठी पनीर हा एकमेव पर्याय आहे. तर मांसाहारी लोकांना दोन्ही पर्याय आहेत. त्यामुळे तुम्हाला वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी यापैकी कोणता पर्याय महत्वाचा असा प्रश्न पडणे साहजिकच आहे.

Egg

अंड्यात किती प्रोटिन असतं?

अंडी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. अंड्यांमध्ये तुमच्या शरीराला दिवसभरासाठी आवश्यक असलेली सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. अंड्यामध्ये 6 ग्रॅम प्रथिने आणि इतर अनेक पोषक घटक असतात. तुम्ही स्क्रॅम्बल्ड एग, उकडलेली अंडी, अंडी करी किंवा पोच केलेली अंडी खाऊ शकता. चरबी जास्त असल्यामुळे अनेक लोकांना अंड्यातील पिवळ बलक खाणे आवडत नाही, पण पिवळ्या बलकातच सर्वात जास्त पोषकतत्व असतात.

egg

का उकडलेल्या अंड्यात मिळणारे पोषक घटक

प्रोटीन:5.5 ग्रॅम

एकूण चरबी : 4.2 ग्रॅम

कॅल्शियम: 24.6 मिलीग्रॅम

लोह : 0.8 मिलीग्रॅम

मॅग्नेशियम : 5.3 मिलीग्रॅम

फॉस्फरस : 86.7 मिलीग्रॅम

पोटॅशियम : 60.3 मिलीग्रॅम

झिंक : 0.6 मिलीग्रॅम

कोलेस्ट्रॉल : 162 मिलीग्रॅम

सेलेनियम: 13.4 माइक्रोग्रॅम (mcg)

paneer

पनीरमध्ये किती प्रोटीन असते?

पनीरमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे प्रत्येक वयोगटातल्या लोकांनी पनीर खाल्ले पाहिजे. पनीर कशाही प्रकारे वापरता येऊ शकते. पनीरचे सर्व पदार्थ प्रथिने मिळविण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. पनीरमध्ये व्हिटॅमिन बी 12, सेलेनियम, व्हिटॅमिन डी आणि रिबोफ्लेविन सारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे. 40 ग्रॅम पनीरमध्ये 7.54 ग्रॅम प्रथिने आणि सुमारे 5 ग्रॅम चरबी असते. जर तुम्ही प्रथिने मिळण्यासाठी पनीर खात असाल तर ते ऑलिव्ह ऑईलमध्ये केल्याने तुम्हाला आणखी फायदे मिळतील.

paneer pakoda

40 ग्रॅम कमी चरबीयुक्त पनीरमधले पोषक घटक -

प्रथिने: 7.54 ग्रॅम

चरबी: 5.88 ग्रॅम

कर्बोदके: 4.96 ग्रॅम

फोलेट: 37.32 मायक्रोग्रॅम

कॅल्शियम: 190.4 मिलीग्रॅम

फॉस्फरस: 132 मिलीग्रॅम

पोटॅशियम: 50 मिलीग्रॅम

Paneer egg Burger

कोणता पर्याय योग्य?

अंड आणि पनीर दोघांमध्येही समान पोषकतत्वे असतात. हे दोन्ही पदार्थ प्रथिनांचे संपूर्ण स्त्रोत आहेत, कारण त्यामध्ये प्रथिने तयार करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व नऊ पोषक असतात. याव्यतिरिक्त, दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी व्हिटॅमिन बी-12 आणि व्हिटॅमिन डी समृद्ध असतात. जर तुम्ही अंड खात असाल तर पनीरही खाऊ शकता. पण, जे लोक अंडी खात नाहीत त्यांनी आहारात पनीरचे प्रमाण वाढवावे. याशिवाय वजन नियंत्रणासाठी आहारात सोया उत्पादने, कडधान्ये आणि नट्स यांचा समावेश करून जास्तीत जास्त प्रथिने व इतर अनेक पोषक घटक मिळू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT