Five Minutes Exersice Benefits
Five Minutes Exersice Benefits  
health-fitness-wellness

पाच मिनिटात पाच व्यायाम करा! झटपट एनर्जी मिळवा

सकाळ डिजिटल टीम

शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम गरजेचा असतो. व्यायामाच्या सुरवातीला फिटनेस तज्ज्ञ कठीण व्यायाम (Exersice) करण्याचा सल्ला देत नाहीत कारण त्याचा तुमच्या शरीरावर (Body) आणि क्षमतेवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी, सुरुवातीला ५ मिनिटांच्या वर्कआउट प्लॅनसह तुम्ही फिटनेस रूटीन सुरू करू शकता. म्हणजेच ५ मिनिटांत ५ वेगवेगळे व्यायाम करू शकता. व्यायामासाठी नवीन असताना एक मिनीट योग्य आहे. नंतर हळूहळू वेळ वाढवू शकता. तुम्ही कोणते व्यायाम करू शकता ते वाचा. मात्र व्यायाम करताना काही काळजी घेणेही गरजेचे आहे.

Stationary jogging

१) एक मिनीटात स्टेशनरी जॉगिंग (Stationary jogging) - पाच मिनीटाच्या वर्कआउट प्लॅनमध्ये स्टेशनरी जॉगिंग हा उत्तम पर्याय आहे. हा प्रकार केल्यामुळे तुमचे शरीर उबदार होईल. तुम्हाला हा प्रकार एका मिनिटात करायचा आहे. त्यासाठी एका जागी उभे राहून जॉगिंग करणे म्हणजे स्टेशनरी जॉगिंग. एका मिनिटांत जितक्या वेगाने धावू शकाल तितकी तुमच्या हृदयाची गती वाढेल. त्यामुळे तुमच्या शरीराला उर्जा मिळेल.

Leg raises

२) दुसऱ्या मिनिटांत लेग रेस (Leg raises) - मुख्य स्नायू आणि पायांसाठी लेग रेस करणे गरजेचे आहे. लेग रेस करण्यासाठी तुम्ही पाठीवर झोपून पाय 90 अंश वर करा, एक पाय वर ठेवून, दुसरा पाय जमिनीच्या जवळ ठेवायचा आहे. पण, त्या पायाचा स्पर्श जमिनीला करायचा नाही. नंतर तो पाय वर करावा लागेल. या व्यायामामुळे तुम्ही कॅलरीज बर्न करू शकाल.

Plank

३) तिसऱ्या मिनीटांत प्लॅंक (Plank) - एका मिनिटांत केल्या जाणाऱ्या व्यायामामध्ये प्लॅंकचाही समावेश आहे यामुळे तुमच्या शरीरात अनेक फायदे होतील. प्लॅक केल्याने तुमचे शरीर मजबूत होईल. शिवाय पोटावरची चरबी कमी होते. प्लॅंक करण्यासाठी, कोपर जमिनीवर ठेवून जमिनीवर झोपा आणि पाय सरळ करा. संपूर्ण शरीराचा भार कोपरावर देऊन पुशअप्स करा.

Surya namskar

४) चौथ्या मिनिटात सूर्यनमस्कार करा- पाच मिनिटांच्या वर्कआउट प्लॅनध्ये सूर्यनमस्काराचा समावेश करू शकता. वजन कमी करण्यासाठी, नैराश्य कमी करण्यासाठी, शरीरातील चयापचय गती वाढवण्यासाठी सूर्यनमस्कार करणे फायद्याचे आहे. सूर्यनमस्कारामुळे शरीराचे स्ट्रेचिंग होते, ज्यामुळे स्नायूवर चांगला परिणाम होतो. तुम्ही एका मिनीटात अगदी सहज सूर्यनमस्कार घालू शकता.

५) पाचव्या मिनिटात लंजेस (Lunges) - फुफ्फुसाचा (Lunges) व्यायाम हा मांड्या आणि पायांसाठी खूप फायदेशीर असतो. हा व्यायाम केल्याने पाठ आणि मानेची स्थिती सुधारते. हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला सरळ उभे राहावे लागेल आणि खांदे एकमेकांपासून दूर ठेवावे लागतील. एक पाय पुढे ठेवून गुडघा वाकवून ९० अंशाचा कोन करून एक मिनिट धरून ठेवा. या व्यायामामुळे खूप फायदा होईल.

Body Stretching

ही घ्या काळजी

- ५ मिनिटांचे हे व्यायाम सुरू करण्याआधी तुम्हाला २ मिनीटे चालण्याचा व्यायाम आणि वॉर्मअप करायचा आहे. असे केल्याने तुम्हाला पुढचे व्यायाम करण्यासाठी आणखी एनर्जी मिळेल.

- हे व्यायाम करण्यासाठी तुम्हाला व्यायामाची कोणतीही साधने लागणार नाहीत.

- एक मिनीट व्यायाम केल्यावर तुम्हाला ३० सेकंद आराम करून मग दुसरा व्यायामाचा प्रकार करायचा आहे.

- दिवसातल्या विशिष्ट वेळीच हे पाच मिनीटांचे व्यायाम करायचे आहेत. असे केल्यावरच तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळतील. वर्कआऊट करण्याच्या आधी आणि नंतर अर्धा तास काहीही खाऊ नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT