Jaggery Tea
Jaggery Tea  
health-fitness-wellness

Jaggery Tea: गुळाचा चहा पिताय, सावधान!

सकाळ डिजिटल टीम

पांढऱ्या साखरेपेक्षा गूळ खाणे चांगले असले तरी चहा आणि गूळ हे कॉम्बिनेशन मात्र चांगले नाही. दोन्ही एकत्र सेवन करणे शरीरासाठी हानीकारक आहे. आयुर्वेदात दोघांना सर्वात वाईट फूड कॉम्बिनेशन श्रेणीत मानले जाते.

गुळाच्या चहाचे तोटे

आयुर्वेदात गुळ ही औषधी गुणधर्मांची खाण मानली जाते. पण दुधात मिसळले की त्याचे सर्व गुणधर्म नष्ट होतात. दूध आणि गुळाची चव वेगळी असते. यामुळे पचनशक्ती कमकूवत होते आणि अपचन, गॅस, ऍसिडीटी सारख्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

चहामध्ये गुळाऐवजी साखरेचा वापर करा

गुळामध्ये जीवनसत्व, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असत. पण ते चहामध्ये मिसळून पिऊ नये. चहामध्ये तुम्ही साखरेऐवजी शुगर कँडी वापरू शकता. शुगर कँडी दुधासारखी थंड असते, त्यामुळे याचा फायदा जास्त होऊ शकतो.

रिकाम्या पोटी गुळाचे सेवन फयदेशीर

ज्यांना बीपीची समस्या आहे त्यांनी गूळ खावा. गुळामुळे तुमची हिमोग्लोबीनची पातळी वाढते. त्याचवेळी चयापचय दर मजबूत करण्यासाठी तुम्ही रिकाम्या पोटी पाण्यासोबत गुळाचे सेवन करू शकतात. जर तुम्हाला बध्दकोष्ठतेचा त्रास होत असेल तर सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत गूळ खाल्ल्याने फायदा होतो. हे शरीर डिटॉक्स करण्याचे काम करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

IPL Revenue: IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT