kid test. 
health-fitness-wellness

लहान मुलांमध्ये दिसू शकतात Long Covid ची लक्षणे; जाणून घ्या कसे ओळखाल

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली-  कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतरही याचे लक्षणं राहू शकतात, याला 'लॉन्ग कोविड' असं म्हटलं जातं. ही लक्षणे काही आठवडे किंवा महिन्यापर्यंत राहू शकतात. लॉन्ग कोविडसंबंधी झालेल्या अनेक संशोधनावरुन स्पष्ट होतंय की, 6 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये लॉन्ग कोविडची लक्षणं दिसून आली आहेत. यामध्ये खोकला, मायलियागिया, ताप, धाप लागणे भ्रम, जोराने श्वसन अशाप्रकारच्या समस्या जाणवू शकतात. लहान मुलांमध्ये दिसत असलेली लक्षणं पुढीलप्रमाणे...

निद्रानाश आणि मानसिक आरोग्याच्या समस्या

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मुलांमध्ये निद्रानाशाची समस्या जाणवू शकते. कोरोनाने पीडित झालेल्या प्रत्येक पाचव्या मुलामध्ये हे लक्षण दिसून आलं आहे. त्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम पडतो. मुलं चिडचिड करु लागतात. 

श्वास घेण्यास त्रास

मुलांमध्ये श्वसनासंबंधी आजार निर्माण होतात. यात सर्दी, फ्लू, एलर्जी होण्याचा धोका आहे. कोरोनातून ठीक झाल्यानंतर श्वसनासंबंधी समस्या जाणवू लागतात. 

थकवा जाणवणे

थकवा आणि मांसपेशीमध्ये त्रास जाणवू शकतो. मांसपेशीच्या तंतूमध्ये सूज येते. वसस्कर लोकांनाही हा त्रास जाणवतो. थकव्यामुळे उर्जा आणि उत्साह कमी झाल्यासारखा वाटतो. संशोधनात 15 टक्के मुलांमध्ये ही समस्या जाणवली आहे. 

एकाग्रतेचा भंग आणि भ्रम

ब्रेन फोग, भ्रम आणि मुलांची विचार करण्याची शक्ती प्रभावित होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या जीवनाची गुणवत्ता खराब होऊ शकते. संशोधनात 10 टक्के मुलांमध्ये विसराळूपणा दिसला आहे. त्यांच्यामध्ये थकवा आणि मन एकाग्र करण्यास समस्या जाणवली आहे. 

पक्षाघाताचा धोका

लॉन्ग कोविडमध्ये मुलांना लकवा, मिरगी, तीव्र डोकेदुखी अशा गंभीर समस्या जाणवू शकतात. वरील सर्व लक्षणांवर उपाय म्हणून मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच लहान मुलांसाठी कोरोना लस उपलब्ध होणे आवश्यक आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोनं 19 हजार तर चांदी 98 हजारांनी स्वस्त! पाहा तुमच्या शहरातील आजचा भाव

Pakistan Cricket : पाकिस्तानचा गोंधळ! T20 World Cup बद्दल केलेला मेसेज डिलिट... आता यांचा काय नवीन ड्रामा? चाहते संतापले

Latest Marathi News Live Update : सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीला

Sanjay Raut statement : सुनेत्रा पवार यांच्या शपविधीवर संजय राऊत म्हणाले, 'शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य योग्यच'

Budget 2026 : 1973 सालच्या बजेटला 'ब्लॅक बजेट' का म्हटलं जात? देशावर नेमकं काय संकट आलं होतं?

SCROLL FOR NEXT