Launch of Pulse Polio Vaccination Campaign across the country 
health-fitness-wellness

कोणी लावला पोलिओच्या लसीचा शोध; कशी झाली पोलियोमाइलिटिस या शब्दाची उत्पत्ती

मिलिंद उमरे

गडचिरोली : कायमचे दिव्यांगत्व देणाऱ्या पोलिओला देशातून हद्दपार करण्यासाठी राबविण्यात येणारी मोहीम रविवारी देशासह जिल्ह्यात प्रारंभ झाली. जिल्ह्यातील बालकांना दो बूंद जिंदगी के अर्थात या लसीचा डोस देण्यात येत आहे. मात्र, या लसीचा इतिहास अनेकांना माहित नाही. चला तर जाणून घेऊया पोलियोमायलिटिस शब्दाची उत्पत्ती कशी झाली आणि लसीचा शोध कोणी लावला...

ट्रान्झिट टीम म्हणजे जिथे बसेस, रेल्वे अशी ठिकाणे आहेत, ज्याठिकाणी त्यांचे थांबे असतील तिथे पल्स पोलिओची लस पाजण्यात येणार आहे. तसेच मोबाईल टीमद्वारे ग्रामीण तसेच दुर्गम भागात पल्स पोलिओची लस लहान बालकांना पाजण्यात येणार आहे. चालू वर्षात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे विशेष सत्र राबविण्यात येत आहे.

ग्रामीण भागात २०९३ व शहरी भागात ४६ असे एकूण २१४२ लसीकरण बूथ आहेत. आवश्‍यक पोलिओ मात्रा ग्रामीण व शहरी मिळूण ११६५२७ लस मात्रा उपलब्ध आहेत. तसेच पल्स पोलिओ मोहिमेकरिता एकूण ६४७९ मनुष्यबळ उपलब्ध असून त्याचे ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच डॉ. समीर बनसोडे यांनीही पल्स पोलिओबाबत माहिती उपस्थितांना सांगितली.

मागील काही वर्षांत जिल्ह्यात पोलिओचे रुग्ण आढळून आले नाहीत. पण खबरदारी म्हणून तसेच देशातून पोलिओचे निर्मूलन करण्यासाठी ही मोहीम नियमितपणे आयोजित करण्यात येते. पुन्हा ही मोहीम पार पडत असून नागरिकांनी आपल्या बालकांना आवर्जून पोलिस डोस द्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पोलिओ या आजाराचा इतिहास रंजक आणि भयानकही आहे. पोलिओ अथवा पोलियोमायलिटिस हा एक विषाणूमुळे बालकांना होणारा आणि त्यांना दिव्यांग करणारा संसर्गजन्य रोग आहे. पोलियोमायलिटिस या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेमधील पोलिओ म्हणजे ग्रे अथवा राखाडी व मायलॉन म्हणजे मज्जारज्जू, तर आयटिस म्हणजे सूज या शब्दांपासून झाली आहे.

असा आहे इतिहास

पोलिओच्या उपसर्गाच्या ९० टक्‍के घटनांमध्ये काहीच लक्षणे आढळून येत नाही. परंतु, विषाणूंनी रक्तप्रवाहामध्ये प्रवेश केल्यास पोलिओ रुग्णांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येतात. हजारो वर्षे पोलिओ सक्रिय परंतु स्थिर अवस्थेत अस्तित्वात होता. १८८० नंतर पोलिओच्या साथींचे युरोपमध्ये मोठे उद्रेक होऊ लागले आणि नंतर लगेचच अमेरिकेत पोलिओच्या साथीचा प्रसार झाला.

यांनी शोधली पोलिओची लस

१९१० पर्यंत जगात पोलिओचा खूपच प्रसार झाला होता. त्यामुळे पोलिओवर उपायकारक लस शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. पोलिओच्या लसी विकसित करण्याचे श्रेय जोनस सॉल्क व अल्बर्ट सेबिन यांना जाते. सरकारच्या नियमित मोहिमांमुळे पोलिओचे जगातून लवकरच उच्चाटन होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

APL 2026: Asian Games मध्ये पदकांची लूट करणारे भारतीय तिरंदाज पुन्हा सज्ज! कधी अन् कुठे पाहाता येणार भारतीय तिरंदाज

MPSC Student Agitation : टिळक चौकातील आंदोलनाकडे नेत्यांची पाठ; उणिवा दुरुस्त करा, पण पद्धत बदलू नका; विद्यार्थ्यांची भूमिका

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Hingoli Fire Tragedy : हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; महिला आणि मुलासह दोघांचा मृत्यू, नगर परिषदेचे कर्मचारी गंभीर भाजले!

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT