sesame
sesame 
health-fitness-wellness

तिळाचे आश्चर्यकारक फायदे, सुंदर आणि निरोगी शरीरासाठी आहे उपयुक्त

सकाळ वृत्तसेवा

भारतात पुराण काळापासून तिळाचा वापर केला जातो. थंडीच्या दिवसात तिळ मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. यात तिळाचे लाडू ते तेल यापर्यंत अनेक पदार्थांचा समावेश आहे. तिळ थंडीच्या दिवसात शरीरात उष्णता वाढण्यासाठी आणि उर्जा तयार कऱण्यासाठी मदत करतात.

केसांच्या मजबुतीसाठी तिळ फायद्याचे ठरते. तिळाचे बी केसांना मजबूत बनवते. बियांमध्ये असलेल्या ओमेगा फॅटी अॅसिडमुळे केसांच्या वाढीला मदत होते तसंच केस गळण्याचं प्रमाण कमी होतं. 

तिळामध्ये अॅटीऑक्सिडेंट आढळतं. वाढत्या वयामुळे होणारा प्रभाव कमी कऱण्यासाठी यामुळे मदत होते. त्वचेला तजेलदार बनवण्यासाठी याचा फायदा होतो.

तिळामध्ये असलेलं तेल त्वचेला आणखी तजेलदार बनवतं. यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते. तसंच चेहऱ्यावर असलेल्या खूणा किंवा त्वचेसंबंधी इतर समस्यांवरही उपायकारक आहे. एक चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये दोन चमचे तिळाची पावडर मिसळून ती चेहऱ्यावर लावल्यास चांगले परिणाम दिसून येतात. दात स्वच्छ करण्यासाठी तिळाचं तेल उपयुक्त ठरतं. यामुळे मुखारोग्य चांगलं राहण्यास मदत होते.

काळे तिळही आरोग्यासाठी उपायकारक असतं. यामधील फायबर आणि फॅटी अॅसिडमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत होते. तिळाचे तेल पाचन शक्ती सुधारण्यासही उपयुक्त ठरते. तिळामध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण भरपूर असतं. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामान खात्याची मोठी माहिती

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापूर-पेणमधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार; पश्चिम बंगालमध्येही आंदोलन

"मी हत्या केलीच नाही," हत्येचे 8 गुन्हे असलेल्या महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT