Prickly Heat Home Remedies 
health-fitness-wellness

घामोळ्यांमुळे त्रस्त आहात! या टिप्स वापरून घ्या काळजी!

कडक उन्हाळ्यात त्वचेशी संबधित समस्या निर्माण होतात

सकाळ डिजिटल टीम

Home Remedies for Prickly Heat: गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे. तापमान ४० च्या आसपास आहे. अत्ताच जर अशी परिस्थिती तर पुढे किती उन असेल याची कल्पना येतेय. कडक उन्हाळ्यात घाम तर येतोच. पण, त्वचेशी संबधित समस्या निर्माण होतात. त्वचेवर रॅशेस येणे, खाज, घामोळं आदी समस्या असतात. उन्हाळ्यात सर्वात जास्त त्रास होतो तो घामोळ्यांचा पाठ, मानवेर अशा विविध ठीकाणी छोटं छोटं पुरळ येऊन जळजळ होते. याचा त्रास अनेकांना होतो. त्यामुळे या पासून वाचण्यासाठी लोकं विविध उपाय करतात. काही घरगुती उपायांमुळे तुम्ही घामोळ्यांपासुन स्वत:चे संरक्षण करू शकाल.

कोरफड जेल-

ही घ्या काळजी

कोरफड जेल - कोरफडीचे जेल लावल्याने घामोळ्यांपासून थोडेसे संरक्षण मिळू शकते. ऐलोव्हेरा जेलमुळे त्वचेशी संबघित समस्या दूर होऊन शरीर थंड राहते. यासाठी जेल जिथे घामोळे आले आहे त्या जागी लावून हलक्या हातांनी मसाज करा १५-२० मिनिटं तसचं राहू द्या. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. दिवसातून दोन ते तीन वेळा हे जेल लावल्याने त्वचेवर पुरळ, खाज सुटणे, जळजळ आदी समस्या दूर होतात. कोरफडीमुळे तुमची त्वचा मऊ होते.

कच्च्या बटाट्याने फायदा- तुम्ही घामोळ्यावर कच्च्या बटाट्याचा रस पिळून लावू शकता. हा रस १० मिनिटं लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने तो रस धुवून घ्या. दिवसातून दोन वेळा हा रस लावल्याने त्वचेवरची जळजळ, टोचणे दूर होते.

मेहंदी पाडवर

मेहंदी पाडवरचाही फायदा- जर तुम्हाला घामोळ्यांचा त्रास असेल तर तुम्ही मेहंदी पावडर वापरू शकता. यासाठी १ चमचा मेहंदी पावडरची पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट घामोळं. रेशेसवर १५ मिनिटं लावा. त्यानंतर धुवून टाका. मेहंदी त्वचा आणि केसांसाठी चांगली असते. त्यात गारवा तर असतोच शिवाय बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे उष्णता लवकर बरी होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT