आल्याचा काढा (Ginger)
आल्याचा काढा (Ginger) Esakal
health-fitness-wellness

Ginger | हिवाळ्यात 'आल्याचा काढा' पिणं आहे फायदेशीर; जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

'आलं' (Ginger) खूप औषधी आहे. आल्याच्या माध्यमातून अनेक आरोग्य समस्यांवर (Health Problems) उपचार करता येतात. घरगुती आणि आयुर्वेदीक (Ayurveda) उपायांमध्ये त्याचा वर्षानुवर्षे वापर केला जात आहे. आल्याचा काढा आरोग्यासाठी खूप लाभदायक (Good for Health) असतो. त्याची चव जरी थोडी तिखट असली तरी त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. त्यामुळे हिवाळ्यात (Winter) हा काढा प्यायल्याने खूप फायदा होतो.

चला, जाणून घेऊया आल्याच्या काढ्याचे फायदे (Benefits of Ginger) -

1. वेदनेतून आराम (Relief from pain)-

कधीकधी व्यायामादरम्यान स्नायू ताणले जातात आणि दुखापतग्रस्त होतात. त्यामुळे वेदना वाढू लागते. त्यामुळे शरीरात वेदना आणि थकवा जाणवतो. या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी आल्याचा काढा जरूर प्या, कारण तो वेदना कमी करतो. याशिवाय आल्याला त्याच्यातील प्रतिजैविक गुणधर्मांमुळे काही संक्रमणांवर उपचार करण्यासाठी देखील ओळखले जाते.

2. दाहकता आणि ऍलर्जी शामक (Anti Inflammatory and anti Allergy) -

आल्यामध्ये जळजळ कमी करण्याची आणि ऑस्टियोपोरोसिस (osteoporosis) सारख्या तीव्र आजारांना बरे करण्याची शक्ती आहे. याशिवाय यात अँटी-एलर्जिक (anti Allergy) गुणधर्म देखील आहेत जे त्याच्या मुळांवर काम करून ऍलर्जी बरे करण्यास मदत करतात.

3. अल्सरपासून संरक्षण करते (Protect from Ulcer)-

आलं अनेक सक्रिय संयुगे जसे की जिंजरॉल आणि शोगोल यांनी समृद्ध आहे, जे पोटासाठी आवश्यक आहेत आणि अल्सर टाळण्यासाठी ओळखली जातात.

आल्याच्या काढ्याचे प्रकार-

1. आले मध, आणि लिंबाचा काढा - हा काढा घसा खवखवण्यापासून आराम देण्यासाठी उपयुक्त आहे. आले, मध आणि लिंबू यांचे मिश्रण जळजळ शांत करण्यासाठी चांगले आहे.

2. तुळसयुक्त आल्याचा काढा- तुळशीची काही पाने घाला. सर्दी आणि खोकल्यापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी, हा काढा तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखला जातो.

3. काळी मिरी, लवंग आणि आल्याचा काढा- हा काढा तुमच्या आरोग्याच्या समस्यांना तोंड देण्यासाठी आणि तीव्र वेदनांपासून आराम मिळवून देण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT