health-fitness-wellness

मलेरिया प्राणघातक आहे का? डॉक्टर म्हणतात...

शर्वरी जोशी

साधारपणे पावसाळा सुरु झाला की सगळीकडे मोठ्या प्रमाणावर डासांची संख्या वाढू लागते. साचलेल्या पाण्यात, कपटांमध्ये वा अडगळीच्या ठिकाणी असंख्य डास पाहायला मिळतात. साचलेल्या पाण्यात एनॉफिलीस नावाच्या मादीमुळे डासांची उत्पत्ती होते. हा डास चावल्यास हिवताप (मलेरिया) होण्याचा धोका संभावतो. मलेरिया झाल्यावर अनेकदा अशक्तपणा, ताप येणे, थंडी वाजणे अशा समस्या निर्माण होतात. खरंतर योग्य काळजी व डॉक्टरांचा सल्ला घेतला तर मलेरिया पूर्णपणे बरा होतो. परंतु, या आजाराविषयी अनेक समज-गैरसमज आहेत. त्यामुळेच हे गैरसमज नेमके कोणते व या आजावरील उपाय कोणते ते पाहुयात.

मलेरिया संबंधी असलेल्या गैरसमजूती कोणत्या?

१. वातानुकूलित खोलीत राहिल्यावर आपल्याला डास चावणार नाही. व परिणामी, मलेरियाचा धोका कमी होईल हा सर्वसामान्य समज आहे. परंतु, वातानुकूल खोलीतदेखील डासांचा शिरकाव होत असतो.

२. एकदा मलेरिया होऊन गेल्यावर पुन्हा मलेरिया होणार नाही असं काहींना वाटतं. परंतु, याविषयी गाफील राहू नका. मलेरिया पुन्हा होऊ शकतो. त्यामुळे पूर्ण अंगभर कपडे घालणे, स्वच्छता राखणे, पाण्याची अतिरिक्त साठवणूक न करणे याकडे लक्ष द्या.

३. मलेरिया प्राणघातक नाही असं काहींना वाटतं. परंतु, कधी कधी दिरंगाई किंवा दुर्लक्षितपणा आपल्याला महागात पडू शकतो. त्यामुळे काही लक्षणं जाणवल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा व वेळीच निदान करा. उपचारास उशीर झाल्यास यकृत आणि लाल रक्तपेशींवर वाईट परिणाम होतो.

४.मलेरिया आणि डेंग्यूचा ताप सारखाच आहे. मलेरिया आणि डेंग्यूची लक्षणे काहीशी सारखी असू शकतात. मात्र, दोन्ही आजार भिन्न आहेत. दोन्ही रोग डासांच्या चाव्यामुळे उद्भवत असले तरी त्यावरील उपचार वेगवेगळे आहेत. मलेरिया आणि डेंग्यूमध्ये फरक ओळखून त्यानुसार उपचार घेणे आवश्यक आहे.

५. झोपेच्या आधी लसूण खाल्ल्याने डासांचा त्रास कमी होईल असा गैरसमज अनेक लोकांमध्ये दिसून येतो. मात्र प्रत्यक्षात तसे नसून अभ्यासाद्वारे हे अद्यापही सिद्ध झालेले नाही. लसूण एक सल्फर कंपाऊंड तयार करतो ज्याला अ‍ॅलिसिन म्हणतात. ज्यात काही अँटी-बॅक्टेरियल, एंटी-फंगल आणि परजीवींना विरोध करतात. परंतु जेव्हा मलेरियाचा विचार केला जातो तेव्हा लसूण आणि मानवी रोगप्रतिकारक शक्तीच्या कार्यक्षमतेबद्दल कोणतेही संशोधन आजतगायत उपलब्ध नाही.

६.कोरड्या हवामानात डासांचा नाश होतो हा देखील एक गैरसमज आहे. कोरड्या हवामानाच्या तुलनेत पावसाळयात डासांची पैदास अधिक प्रमाणात होत असली तरी उन्हाळ्यातही अशा प्रकारचे डास दिसून येतात.

डास चावल्यानंतरही लक्षणे न जाणवल्यास मलेरिया होणार नाही या भ्रमात राहू नका

डास चावल्यानंतर होणा-या प्रतिक्रिया या व्यक्तीनुसार भिन्न असू शकतात. काही लोकांना त्वचा लालसर होणे, खाज सुटणे आणि वेदना होणे अशी लक्षणे दिसून येतात. काहींना यातील कोणतीच लक्षणे दिसून येत नाही. ताप, थंडी वाजून येणे आणि डोकेदुखी यासारखी लक्षणे आढळून आल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच योग्य निदान करून निरोगी आयुष्य जगू शकता.

(डॉ. विक्रांत शहा हे चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये इंटेसिव्हिस्ट आणि संसर्गजन्य रोग तज्ज्ञ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT