kids  esakal
health-fitness-wellness

अचानक वातावरण बदललय! अशी घ्या मुलांची काळजी

सकाळ डिजिटल टीम

सलग दोन दिवस पडलेला अवकाळी पाऊस, त्यामुळे वाढलेला कमालीचा गारवा यामुळे लहान मुलांच्या तब्येतीवर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. त्यात ऑम्रिकोनच्या भितीनेही डोके वर काढले आहे. काल कर्नाटकध्ये नव्या व्हेरियंटचे २ रूग्ण आढळले. तर आज मुंबईतही साउथ आफ्रिकेतून आलेले 9 जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळेच एकंदरीत भिती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर नवजात बालकांची, लहान मुलांची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.

नुकत्याच 8वी ते 10 वी च्या शाळा सुरू झाल्या आहेत आणि प्राथमिक शाळा पण उघडण्याच्या विचारत आहे. परंतु ह्या नवीन variant मुळे परत सगळे तळ्यात जा मळ्यात झाले आहे. त्यात पाऊस पडला आहे. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने मुलं आजारी पडण्याची शक्यता बळावली आहे. यासाठी त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे. पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलच्या बालरोगविभागप्रमुख डॉ दिपाली अंबिके यांनी मुलांची काय काळजी घ्यावी ते सांगितले आहे.

kids

१) मुलं दिवसभर घरी आहेत. त्यामुळे नेहमीच्या कपड्यांबरोबर स्वेटर, कानटोपी घालणे गरजेचे आहे. रात्रीही त्यांना थंडी वाजू नये म्हणून हे कपडे घालावेत. त्यामुळे त्यांचे संरक्षण होईस.

२)एकदम वाढलेली थंडी, वाढलेली हवेतील आद्रता, ह्युमेडिटी यामुळे व्हेंटिलेशन कमी होते आहे. थंडीत अनेकजण दारे, खिडक्या बंद ठेवतात.या कारणामुळे एकमेकांची इनफेक्शन एकमेकांना होऊ शकतात. म्हणून थोडावेळ का होईना दारं खिडक्या उघडी ठेवावीत. कारण .या काळाक फ्लू,इन्फ्ल्यूएन्झा व्हायरस, रायनो व्हायरसमुळे या नॉन कोविड variant मुळे आजार वाढण्याची शक्यता असते.

३) पाऊस पडल्यामुळे जे पाणी साचून राहते आहे, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंगू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरात शक्यतो या काळात पाणी साठवून ठेऊ नका.

४) डेंग्यू, मलेरिया होऊ नये म्हणून त्यांना मच्छरदाणीत झोपवणे गरजेचे आहे. तसेच मॉस्किटो रिपलेंट लावणेही गरजेचे आहे. असे केल्यास मुलांना भविष्यात त्रास होणार नाही.

५) मुलांचे पालक दिवसभर बाहेर राहत असतील, तर त्यांनी घरी आल्यावर पहिल्यांदा आंघोळ करणे, बाहेरचे कपडे धुवणे अशा गोष्टी केल्यावरत मुलांच्या संपर्कात यावे. असे केल्याने मुलं कोणताही त्रास होण्यापासून वाचू शकतात.

६) त्यांना गरम सकस आणि पौष्टीक आहार खायला द्यावा. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

History! फुटबॉल खेळणाऱ्या देशाचे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पदार्पण; इटलीचा संघ T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी पात्र ठरला

IND vs ENG 3rd Test: शुभमन गिलने मोडला 'विराट' विक्रम! लोकेश राहुलच्या फिफ्टीने लढवला किल्ला, रिषभ पंत दुखापतीतून सावरला

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT