work from home handle home work and health 
health-fitness-wellness

Work From Home करताय का? घर, काम आणि आरोग्य असे सांभाळा

सकाळ वृत्तसेवा

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळित झालं आहे. अनेक उद्योगधंदे, ऑफिस कोरोनाच्या प्रकोपामुळे बंद ठेवण्यात आले आहेत. अशा वेळी अनेक कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्यास सांगण्यात आले आहे. घरुन काम करण्याची सवय नसल्याने आणि घराच्या बाहेर निघता येत नसल्याने अनेकजण मानसिक तणावातून जात आहेत. अशावेळी घर, काम आणि आरोग्य सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे. 

- ऑफिसमधून आलेला एखादा कॉल किंवा मेसेज तुमचं लक्ष विचलित करु शकतो. त्यामुळे ऑफिसच्या कामासाठी एक निश्चित वेळ ठरवून टाका, त्यानंतर ऑफिसमधून येणारा कॉल स्वीकारु नका.

- वेळेचे नियोजन खूप महत्वाची गोष्ट आहे. घरातील काम करायचे असतील तर सकाळी लवकर उठा आणि मिळून-मिसळून काम करा. नियोजित तास ऑफिसच्या कामासाठी द्या.

- घरुन काम सुरु असल्याने तुम्हाला खूप वेळासाठी एकाच जागेवर बसून दररोज काम करावं लागत आहे. ऑफिसच्या कामासाठी घरामध्ये एखादी जागा निश्चित करा. तुमचा लॅपटॉप किंवा पीसी त्याठिकाणी ठेवा. घरात कुठेही बसून काम करण्यापेक्षा एक जागा निश्चित करणं कधीही चांगलं.

-दैनंदिन कामकाजाचा क्रम बदलू नका. सकाळी लवकर उठून अंघोळ केल्यानंतरच कामाला लागा. कामाचा क्रम ठरला असल्याने वायफळ गोष्टींकडे तुमचे लक्ष जाणार नाही. 

- घरात लहान मुलं असतील तर प्राथमिकता ठरवून घ्या. काम महत्वाचं असेल तर काम करुन घ्या, मुलांकडे लक्ष देणे महत्वाचे असेल तर मुलांना प्राथमिकता द्या. जेणेकरुन तणाव निर्माण होणार नाही.

-तुमचा दिनक्रम कितीही व्यस्त असला तरी व्यायाम आणि योगा करण्यासाठी वेळ नक्की काढा. यामुळे तुमचं मन स्थिर राहिल आणि तुम्ही तणावमुक्त राहू शकाल.

- कामातून थोड्यावेळासाठी ब्रेक घेतल्यानंतर आपल्या कामाचे स्वरुप घरातील छोटे किंवा वयस्कांना समजावून सांगा. त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करा. हे तुम्हाला मजेदार आणि मोकळेपणाचे वाटेल.

- तणावाखाली जाण्यापासून वाचण्यासाठी प्रत्येक गोष्ट गंभीरतेने घेणे टाळा. छोट्या-छोट्या गोष्टींबाबत खूप वेळ विचार करु  नका. घरातील अन्य व्यक्तींची मदत करा आणि त्यांनाही कामात मदत करा. 

- दिवसातून दररोज किमान 15 मिनिटांसाठी ध्यानधारणा नक्की करा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. आरोग्याला नेहमी पहिली प्राथमिकता द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Cabinet: मोदी सरकारमधील अनेक मंत्री देणार राजीनामे? देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मोठी माहिती समोर

West Bengal Politics: पक्षात काहीतरी मोठं शिजतंय? ममतांच्या एका निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ, अचानक उचललं मोठं पाऊल

Ketan Agrawal Lohgad Case : केतन अग्रवाल प्रकरणात महत्वाची अपडेट, लोहगडावरील हत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर; दोघेही रोमान्स करताना दिसले

Latest Marathi News Live Update : कुर्ला-चेंबूर परिसरात मोठी वाहतूक कोंडी

IPL 2027 Trade: हार्दिक पांड्यासाठी RR नंतर आणखी एक संघ मैदानात, कर्णधारपदाची ऑफर; मराठमोळ्या खेळाडूची 'वापरा अन् फेकून द्या' अशी होणार अवस्था

SCROLL FOR NEXT