Reverse Walking
Reverse Walking sakal
आरोग्य

Reverse Walking : सरळ तर चालताच तुम्ही, आता उलटही चालून बघा; मिळतील जबरदस्त फायदे

नमिता धुरी

मुंबई : चालणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम मानला जातो. यामुळे तुमचे वजन तर नियंत्रणात राहतेच शिवाय रक्तदाब, मधुमेह, हृदय आणि किडनीशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो. याशिवाय रोज सकाळी चालण्याने शरीराला व्हिटॅमिन-डीही मिळते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. म्हणूनच डॉक्टर दररोज ४० मिनिटे चालण्याचा सल्ला देतात.

पण, आज आपण सामान्य चालण्याचे नाही तर उलट चालण्याच्या फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत. (benefits of reverse walking exercise )

इंटरनॅशनल जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, उलटे चालणे हा सर्वोत्तम कार्डिओ व्यायाम आहे, ज्यामुळे वजन कमी करण्यासोबतच संपूर्ण शरीरात अनेक बदल दिसून येतात.

पाय मजबूत होतात

आपण सहसा पुढे चालतो. त्यामुळे पायांच्या मागच्या काही स्नायूंना काही फायदा होत नाही. त्यामुळे रिव्हर्स वॉकिंग करताना स्नायूही वेगात हालचाल करतात. याशिवाय मागे चालण्यासाठी पायांच्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूंच्या स्नायूंचा चांगला व्यायाम होतो, ज्यामुळे पाय मजबूत होतात.

पाठदुखीपासून आराम

जर्नल ऑफ चिरोप्रॅक्टिक मेडिसीनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, जर तुमच्या हॅमस्ट्रिंगमध्ये लवचिकता कमी असेल, तर यामुळे पाठीच्या खालच्या भागात वेदना होऊ शकतात. म्हणूनच हे टाळण्यासाठी आपण दररोज किमान १५ मिनिटे मागे चालले पाहिजे.

गुडघ्यांवर कमी परिणाम होतो

BMC Musculoskeletal Disorders या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, ज्या लोकांना गुडघेदुखी किंवा दुखापत आहे ते मंद गतीने उलटे चालणे करू शकतात, कारण त्याचा गुडघ्यावर कमी परिणाम होतो.

जर्नल ऑफ बायोमेकॅनिक्समध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका संशोधनात असेही आढळून आले की उलटे किंवा मागे धावण्याने गुडघेदुखी कमी होते.

मन शांत राहते

जर्नल ऑफ फिजिकल थेरपी सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, उलटे चालल्याने संतुलन सुधारते आणि आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात, जे तुम्हाला शांत ठेवण्यास मदत करतात.

उलट चालण्याचे इतर फायदे

  • कॅलरीज जलद बर्न करतात.

  • सायटिकामध्ये मदत होते.

  • हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

  • मेंदूला चांगला व्यायाम होतो.

  • मानसिक आरोग्य चांगले राहते.

  • रात्री चांगली झोप लागते.

  • मेटाबॉलिझमला चालना मिळते.

किती वेळ व्यायाम करावा ?

तुम्ही हा व्यायाम दररोज १५ मिनिटे (दिवसभरात केव्हाही) करू शकता.

काळजी

तुमच्या आजूबाजूला गालिचा किंवा फर्निचर नाही याची काळजी घ्या. आपले घोटे सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य शूज घाला. तुम्ही उद्यानात व्यायाम करत असल्यास, स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी तुमच्या आजूबाजूचे लोक, प्राणी, तसेच खड्डे यांवर लक्ष ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rally: पुतिन जसं विरोधकांना संपवतात, तसाच प्रयत्न मोदींकडून सुरु; अरविंद केजरीवाल यांचा घणाघात

Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल!

Microsoft linkedin Work Trend: भारतातील किती टक्के कर्मचारी कामाच्या ठिकाणी AI चा वापर करतात?

Karad News : कऱ्हाड बाजार समितीत कोल्हापूरच्या शेतकऱ्याच्या गुळाने खाल्ला भाव; क्विंटलला मिळाला 'इतका' उच्चांकी दर..

Latest Marathi News Live Update: PM मोदी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना केलं अभिवादन

SCROLL FOR NEXT