kidney failure सकाळ डिजिटल टीम
आरोग्य

किडनी फेल होण्याआधी शरीरात दिसतात हे लक्षणे, जाणून घ्या

जेव्हा किडनीच्या आजाराबद्दल शंका वाटू लागते तेव्हा डॉक्टरांना भेटून रोगाचे निदान आणि त्यावर उपचार केले पाहिजे

सकाळ डिजिटल टीम

भारतात किडनीचे आजार असलेल्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे किडनीच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. किडनीचे असे अनेक आजार आहेत, जे बरे होऊ शकत नाहीत. त्यामुळे जेव्हा किडनीच्या आजाराबद्दल शंका वाटू लागते तेव्हा डॉक्टरांना भेटून रोगाचे निदान आणि त्यावर उपचार केले पाहिजे. किडनीच्या अनेक गंभीर आजारामध्ये रोगाची काही लक्षणे जाणून घेऊया.

लक्षणे -

किडनीच्या आजाराची सुरुवातीची काही लक्षण पुढील प्रमाणे -

1) कमी लघवी लागणे.

2) सांधेदुखीचा त्रास होणे.

3) धाप लागणे.

4) लघवीचा रंग बदलणे.

जेव्हा किडनी निकामी होते,तेव्हा खालील लक्षणे आढळतात -

1) डोकेदुखी होणे.

2) अंगाला खाज सुटणे.

3) दिवसभर थकवा जाणवने.

4) रात्री झोपण्यास अडचण निर्माण होणे.

5) वजन कमी होणे किंवा भूक न लागणे.

6) स्मरणशक्ती कमी होणे.

7) लघवीच्या रंगात बदल होणे

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, हे किडनी निकामी होण्याचे मोठे लक्षण असू शकते. अशी लक्षण आढळल्यास डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधायला पाहिजे.

किडणीच्या रोगासंदर्भात काही चुकीच्या समजुती आहे-

१. किडनी खराब झाल्यास एकच किडनी निकामी होते

२. किडनीचे सर्व आजार गंभीर असतात

३. किडणी फेल्युअरमध्ये, सर्व रोग्याच्या अंगावर सूज दिसते

४. एकदा डायलिसीस केल्यावर वारंवार डायलिसीस करणे आवश्यक असते

५. किडनी दान केल्यामुळे तब्येतीवर विपरीत परिणाम होतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT