Relation Between Alarms And High Blood Pressure  sakal
आरोग्य

Alarms and Hypertension: अलार्म’ने जाग येणं ठरतंय ‘हाय ब्लड प्रेशर’चं कारण? मेंदूविकार तज्ज्ञांच्या संशोधनात काय सांगितलंय?

Can Waking Up With An Alarm Cause High Blood Pressure: अलार्मने झोपेतून अचानक उठल्यास रक्तदाब वाढू शकतो; मेंदूविकार तज्ज्ञांनी दिला इशारा.

Anushka Tapshalkar

How Sleep Inertia Affects Brain And Heart Health: चांगल्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते ती म्हणजे पुरेशी झोप. पण फक्त पुरेशी झोप महत्त्वाची नसते तर झोप पूर्ण होऊन शांत जाग येणेदेखील महत्त्वाचे असते. त्यासाठी आपल्यापैकी अनेकांना सकाळी उठायला अलार्मची मदत लागते. पण हा नेहमीचा सवयीतला अलार्म आपल्या आरोग्यासाठी हानिकारक तर ठरत नाही ना? अ‍ॅपोलो हॉस्पिटल, हैदराबाद येथील मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. सुधीर कुमार यांनी यावर एक महत्वाचं निरीक्षण शेअर केलं आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

बदलतं आणि वेगवेगळं कामाचं वेळापत्रक यामुळे रात्री उशीरा कीतीही वाजता झोपावे लागते. परंतु रात्री उशीरा झोपल्यामुळे सकाळी लवकर उठायला कठीण जाते त्यामुळे बऱ्यापैकी सगळेचजण अलार्म लावून झोपतात. पण यामुळे शक्यतो गरजेची असलेली 7-8 तासांची झोप पूर्ण होत नाही.

याचबद्दल मत मांडताना डॉ. सुधीर कुमार सांगतात की, अलार्ममुळे झोपेतून अचानक उठल्यावर रक्तदाबात तब्बल ७४ टक्के वाढ होते, असं UVA स्कूल ऑफ नर्सिंगच्या एका अभ्यासात दिसून आलं आहे. विशेषतः जे लोक ७ तासांपेक्षा कमी झोप घेतात, त्यांच्यात हा वाढलेला रक्तदाब अधिक गंभीर ठरतो.

ही रक्तदाबातील झपाट्याने वाढ हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढवू शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ज्यांना आधीपासून हृदयाचे विकार किंवा उच्च रक्तदाब आहे, त्यांच्यासाठी हा धोका अधिक असतो.

डॉ. कुमार म्हणाले असेही म्हणाले की, "अलार्ममुळे झोपेतून अचानक उठल्याने 'स्लीप इनर्शिया' होतो. म्हणजेच झोपमोड झाल्यानंतर काही वेळासाठी मन जडसर वाटणं, विचार करताना गोंधळ होणं आणि नीट लक्ष न लागणं अशा समस्या या परिस्थितीत निर्माण होतात. त्यामुळे उठल्यावर १-२ तास थकवा, गुंगी आणि चिडचिड जाणवते."

पर्यायी मार्ग

  • रोज अलार्म लावण्याची सवय टाळा

  • पुरेशी झोप (७-८ तास) घ्या, जेणेकरून शरीराली नैसर्गिकरित्या उठण्याची सवय लागेल

  • झोपताना खोलीत नैसर्गिक प्रकाश येईल याची काळजी घ्या

  • रोज एकाच वेळेला झोपाण्याचा आणि उठाण्याचा प्रयत्न करा

  • अलार्म लावावाच लागला तर जोरात किंकाळणारा टोन न वापरता, एखादा शांत आणि सुरेल आवाज निवडा

ग्लेनइगल्स हॉस्पिटल, मुंबई येथील डॉ. मंजुषा अग्रवाल यांचंही मत असंच आहे. त्या म्हणतात, "अलार्ममुळे झोप अचानक तुटली तर शरीरात तणाव वाढवणारा कॉर्टिसोल हा हार्मोन वाढतो. त्यामुळे उठल्यावर चिडचिड, अस्वस्थता आणि उदास वाटू शकतं."

तसेच त्या सांगतात की, दररोज एकाच वेळी उठण्याची सवय लावली तर शरीर नैसर्गिकरित्या त्या वेळेला जागं व्हायला शिकतं, आणि अलार्मशिवायही जाग येऊ शकते.

हे लक्षात ठेवा

  • दररोज ठराविक वेळेला झोपा आणि उठा

  • ७-८ तास शांत झोप आवश्यक आहे

  • अलार्म वापरायचाच असेल तर नैसर्गिक आवाज, पाण्याचा आवाज किंवा मधुर संगीत वापरा

  • जोरात किंकाळणारे आवाज टाळा

  • तुमच झोपेचं वेळापत्रक जर नियमित असेल तर तुम्हाला कोणतेही आजार होणार नाहीत आणि आरोग्यही चांगले राहिल.

शांत झोप आणि तसेच शांतपणे जाग आली तर तुमचं आरोग्य आणि मूड दोन्ही सुधारू शकतं!

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli west Building incident : मोठी बातमी! डोंबिवली पश्चिमेतील 25 कुटुंब राहत असलेली चार मजली इमारत खचली!

Rahul Gandhi and Mallikarjun Kharge: ...म्हणून यंदा राहुल गांधी अन् खर्गे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला गेले नाहीत!

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

SCROLL FOR NEXT