Heart Attack esakal
आरोग्य

Cholesterol : लाईफस्टाईलच्या ‘या’ चुकीच्या सवयीमुळे येतो कमी वयात Heart Attack

आपल्या शरीराला काही प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते जे सेल मेंब्रेन, व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी आवश्यक असते.

सकाळ डिजिटल टीम

Bad Habits Causes Heart Attack : काही वर्षांपूर्वी Heart Attack हा खूप दूर्मिळ विकार होता. वयाच्या ५० नंतर साधारण हा विकार उद्धभवत असे. पण दिवसेंदिवस हृदय विकाराचा झटका येण्याचं वय कमी कमी होत जाऊन आता ३० शी आतल्या वयातही हृदय विकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत.

कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ आहे जो रक्ताच्या नसांमध्ये आढळतो. कोलेस्टेरॉल तुमच्या यकृतामध्ये तयार होते परंतु काहीवेळा ते तुम्ही खाल्लेल्या अन्नामुळे देखील तयार होते. त्यामुळे जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी राखणे गरजेचे आहे.

आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल आढळतात ज्याला चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरासाठी खूप चांगले मानले जाते कारण ते अनेक कार्ये करते. त्याच वेळी, खराब कोलेस्ट्रॉल खूप वाईट मानले जाते कारण ते अनेक रोगांचा धोका वाढवते.

या कारणांमुळे कोलेस्ट्रॉल वाढते

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन नुसार, अनेक रोग, तुमची जीवनशैली, कौटुंबिक इतिहास यामुळे कोलेस्टेरॉलचा धोका लक्षणीय वाढतो. मात्र, काही गोष्टींवर नियंत्रण ठेवून तुम्ही कोलेस्ट्रॉलचा धोका कमी करू शकता.

सॅच्युरेटेड फॅटमुळे वाढते कोलेस्ट्रॉल

जे लोक सॅच्युरेटेड फॅट, ट्रान्स फॅट असलेले पदार्थ खातात, त्यांना कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याचा धोका जास्त असतो. तूप, लोणी, केक, मांस, बिस्किट, चीज इत्यादी अनेक गोष्टींमध्ये सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅटचा समावेश होतो. या सर्व गोष्टींमुळे हृदयविकाराचा धोका खूप वाढतो.

अजिबात व्यायाम न करणे

जर तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचे असेल तर त्यासाठी तुम्ही दररोज 20 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. जर तुम्ही व्यायाम करत नसाल किंवा कोणत्याही प्रकारच्या शारीरिक हालचाली करत नसाल तर तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू लागते. लठ्ठपणामुळे कोलेस्टेरॉलची पातळी देखील वाढू शकते.

धूम्रपान करणाऱ्यांना धोका असतो

धुम्रपानामुळे तुमच्या रक्तपेशी खराब होऊ लागतात आणि त्यामध्ये चरबी जमा होऊ लागते. धूम्रपानामुळे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉलही कमी होऊ लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

Mumbai News : चार महिने झाले... आई अजूनही दाराकडे पाहतेय; ‘अब्दुल’ कुठे आहे?

Latest Marathi News Live Update : स्वातंत्र्यदिनानिमित्त बीबी का मकबऱ्याला मनमोहक तिरंगी रोषणाई

Stray Dogs : भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर! ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र ‘डॉग शेल्टर’ उभारा

Shirur Market Committee Election : शिरूर बाजार समितीची निवडणूक तात्काळ घ्या; काँग्रेस पक्षाची मागणी

SCROLL FOR NEXT