Coffee for Liver  sakal
आरोग्य

Coffee for Liver : यकृताच्या गंभीर समस्या कॉफीमुळे होतील दूर; रोज एवढी कॉफी प्या

फॅटी लिव्हर आणि लिव्हर सिरोसिससारख्या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी कॉफी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

नमिता धुरी

मुंबई : कॉफी आपल्यासाठी फायदेशीर आहे की हानिकारक आहे यावर बराच काळ चर्चा होत आली आहे. बर्‍याच अभ्यासांतून असे निदर्शनास आले आहे की कॉफीचे जेव्हा मर्यादित प्रमाणात सेवन केले जाते तेव्हा काही आरोग्यविषयक फायदे मिळतात.

एवढेच नाही तर यकृतातील गुंतागुंत कमी करण्यासाठीही हे फायदेशीर आढळले आहे. म्हणजेच फॅटी लिव्हर आणि लिव्हर सिरोसिससारख्या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी कॉफी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

एका अभ्यासात, शास्त्रज्ञांना असे आढळून आले की ज्या लोकांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर समस्या आहे त्यांना कॉफी प्यायल्याने त्रास कमी होऊ शकतो.

याआधीच्या अभ्यासानुसार कॉफीचे नियमित सेवन हृदयाचे आरोग्य, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. हेही वाचा - आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

किती प्रमाणात कॉफी फायदेशीर ठरेल ?

जॉन्स हॉपकिन्सच्या अहवालानुसार, अमेरिकन लोकांसाठी आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे शिफारस करतात की महिलांनी दिवसातून तीन ते पाच कप कॉफी प्यावी, ज्यामध्ये ४०० मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफिन नसते.

पण तुम्ही गरोदर असाल किंवा स्तनपान करत असाल तर याबाबत डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. दिवसातून दोन ते तीन कप प्रत्येकासाठी सुरक्षित मानले जातात.

कॉफीचे फायदे

यकृतासाठी कॉफी फायदेशीर आहे

यकृताचे आरोग्य राखण्यासाठी कॉफी उपयुक्त ठरू शकते, असे अभ्यासक सांगतात. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की दररोज दोन कप कॉफी प्यायल्याने यकृताचा आजार असलेल्या लोकांमध्ये यकृत सिरोसिस आणि यकृत कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

फॅटी लिव्हरची तीव्रता कमी करण्यासाठी कॉफीचे फायदे देखील असू शकतात. संशोधकांना असे आढळून आले की दररोज तीन ते चार कप कॉफी प्यायल्याने यकृताच्या दीर्घकालीन आजाराची समस्या ७१ टक्क्यांनी कमी होऊ शकते.

नैराश्यात फायदेशीर

अभ्यासात असे आढळून आले आहे की कॉफी प्यायल्याने नैराश्याचा धोका कमी होतो. अभ्यासाच्या पुनरावलोकनात असे दिसून आले आहे की दररोज दोन कप कॉफीचे सेवन केल्याने नैराश्याचा धोका ८ टक्क्यांनी कमी होतो.

कॉफी मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करते आणि चिंता विकार कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. कॉफीचे मध्यम सेवन मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.

मधुमेहाचा त्रास कमी होतो

संशोधकांना असे आढळून आले की जे लोक कॉफी पितात त्यांना रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका कमी असतो. टाईप-2 मधुमेहाचा विकास आणि त्याची गुंतागुंत कमी करण्यासाठी कॉफीचे नियमित सेवन करणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर आहे.

अभ्यासाच्या पुनरावलोकनात असे आढळून आले की दररोज दोन ते तीन कप कॉफीमुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका 6 टक्क्यांपर्यंत कमी होतो. स्वादुपिंडातील बीटा पेशींच्या कार्याला चालना देण्यासाठी आणि इन्सुलिन उत्पादनामध्ये देखील हे फायदेशीर आहे.

सूचना - लेखात दिलेली माहिती सामान्य ज्ञानासाठी असून हा कोणत्याही आजारावरील उपचार असू शकत नाही. कोणत्याही उपचारांसाठी कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT