kadha and vitamin tablets esakal
आरोग्य

काढा अन् व्हिटामिन गोळ्यांच्या सतत सेवनाने भलतेच आजार?

सकाळ डिजिटल टीम

कोरोनावर (Corona virus) उपाय तसेच रोगप्रतिकारकशक्ती (Immunity) वाढविण्यासाठी गेल्या वर्षांपासून अनेकांनी आयुर्वेदाचा आधार घेतला. त्यात काळी मिरी, लवंग, दालचिनी व इतर गरम मसाल्याचे विविध पदार्थ टाकून बनवलेले काढे पिण्याचा ट्रेंडच सुरू झाला. पण जर का तुम्ही रोज गरम मसाले टाकून उकळलेले काढे पिण्याबरोबरच व्हिटामिन्सच्या गोळ्या घेत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण काढ्यांच्या आणि गोळ्यांच्या अतिसेवनाने अनेकांना भलतेच आजार होत असल्याचे समोर आले आहे. वाचा सविस्तर>>

(Constant-intake-of-Extracts-and-Vitamin-tablets-causes-many-ailments)

तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय नको रे बाबा...!

रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी स्वत;च्या शरीरावर विविध प्रयोग न करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. त्यातच शरीराला आवश्यक तेवढ्याच व्हिटामिन्सची गरज असते. पण सध्या सगळेजण कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय व्हिटामिन्सच्या गोळ्या खात आहेत. यामुळे मर्यादेपेक्षा जास्त व्हिटामिन्स शरीरात गेल्यानेही अनेकांना त्रास होऊ लागला आहे. काहीजण तर अजूनही हे काढे पित असून त्यांना आता पोटाविषयी समस्या निर्माण झाल्याचे समोर आले आहे. त्यात काहीजणांना बद्धकोष्ठ, पाईल्सची व्याधी झाली आहे. तर काढ्यांच्या अतिसेवनामुळे काहीजणांवर शस्त्रक्रियाही कराव्या लागल्या आहेत. यामुळे अशा व्यक्तींना लेजर थेरपी द्यावी लागत असून काहीजण औषध गोळ्या खाऊनही बरे होत आहेत. तर व्हिटामिन्सचा ओव्हरडोस झाल्याने हायपर अ‍ॅसिडिटी, जुलाब, पोटात जळजळ, पोटदुखीच्या समस्या काहींना होत आहेत. त्यातही व्हिटामिन डी च्या ओव्हरडोसमुळे बद्धकोष्ठसारख्या समस्या होतात तर व्हिटामिन सी च्या अतिसेवनामुळे अतिसाराचा त्रास होतो. यामुळे स्वत: डॉक्टर बनू नका तज्त्रांचा सल्ला घ्या असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

(डिसक्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)

(Constant-intake-of-Extracts-and-Vitamin-tablets-causes-many-ailments)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT