थोडक्यात:
गर्भधारणेदरम्यान मधुमेह टाईप 1, टाईप 2 आणि गेस्टेशनल डायबेटिस अशा प्रकारांमध्ये दिसून येतो आणि आई व बाळासाठी धोका निर्माण करू शकतो.
योग्य आहार, नियमित तपासणी, व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने मधुमेहाचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते.
प्रसूतीनंतरही मधुमेहावर लक्ष ठेवणे आवश्यक असून भविष्यातील टाईप 2 मधुमेह टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे महत्त्वाचे आहे.
Diabetes Management During Pregnancy: गर्भधारणेदरम्यान मधुमेह हा एक गंभीर विषय बनत आहे. ज्याचा परिणाम आईच्या तसेच बाळाच्या आरोग्यावर करू शकतो. गर्भधारणेआधी, गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूती नंतर मधुमेहाचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या गरोदर स्त्रियांमध्ये टाईप १, टाईप २ आणि गरोदरपणात होणारा मधुमेह (गेस्टेशनल डायबेटिस) वाढत असल्याचे दिसून येते. तज्ज्ञांच्या मते, मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित तपासणी आणि आरोग्यदायी जीवनशैली अवलंबणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मधुमेह शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणाऱ्या प्रक्रियेला बाधा आणणारा एक आजार आहे. तसेच याचे तीन प्रकार आहेत.
टाईप १ मधुमेह
या प्रकारच्या मधुमेहामध्ये शरीरातील इन्सुलिन तयार करण्याची क्षमता कमी होते.
टाईप २ मधुमेह
या मधुमेहामध्ये शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहात नाही.
गर्भधारणेतील मधुमेह (गेस्टेशनल डायबेटिस)
हा मधुमेह गर्भधारणेत पहिल्यांदाच आढळून येतो आणि प्रसूतीनंतर काही स्त्रियांमध्ये टाईप 2 मधुमेह होण्याची शक्यता वाढते.
अहवालानुसार, 2016 मध्ये अमेरिकेत ज्या महिलांनी बाळाला जन्म दिला, त्यापैकी 1% महिलांना टाईप 1 किंवा टाईप 2 मधुमेह होता. 2021 पर्यंत हा दर वाढून 8% महिलांना गरोदरपणात मधुमेह झाल्याचे दिसून आले. विविध वंशांमध्ये याचा प्रभाव वेगवेगळा आहे. आशियाई महिलांमध्ये गर्भधारणेतील मधुमेहाचे प्रमाण जास्त आहे, तर अमेरिकन इंडियन, अलास्का नेटिव्ह, नेटिव्ह हवाईयन आणि पॅसिफिक आयलँडर महिलांमध्ये पूर्वीपासून मधुमेह असण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
अनियंत्रित मधुमेहामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात. गर्भधारणेच्या सुरुवातीलाच रक्तातील साखरेची पातळी जास्त असेल तर बाळामध्ये जन्मजात दोष येणे, मृत्यू होणे किंवा अकाली प्रसूती (Premature Delivery) होण्याची शक्यता वाढते. तसेच, मधुमेह असलेल्या महिलांना सिझेरियन प्रसूतीची शक्यता जास्त असते. मधुमेह असलेल्या स्त्रियांची मुले अधिक वजनाची जन्माला येतात आणि पुढे जाऊन त्यांना लठ्ठपणा आणि टाईप 2 मधुमेहाचा धोका अधिक असतो.
मधुमेह असलेल्या महिलांनी गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे, औषधांमध्ये आवश्यक ते बदल करणे आणि संभाव्य समस्या ओळखणे शक्य होते. गर्भधारणेदरम्यान योग्य आहार, नियमित रक्तातील साखरेची तपासणी, व्यायाम आणि आवश्यकतेनुसार इंसुलिन घेणे महत्त्वाचे ठरते. गरोदरपणात मधुमेह असलेल्या महिलांनी या गोष्टींचे काटेकोर पालन केल्यास त्याचे दुष्परिणाम टाळता येतात.
ज्या महिलांना गर्भधारणेदरम्यान मधुमेह झाला होता, त्यांना भविष्यात टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे, डॉक्टर प्रसूतीनंतर 4 ते 12 आठवड्यांत मधुमेहाची चाचणी करण्याचा सल्ला देतात. रक्तातील साखरेची पातळी नॉर्मल आली तरी प्रत्येक 1 ते 3 वर्षांनी तपासणी करणे गरजेचे आहे. पूर्वीपासून मधुमेह असलेल्या महिलांनीही डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली साखर नियंत्रणात ठेवणे आणि आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे.
गर्भधारणेदरम्यान मधुमेहाची तपासणी 24 ते 28 व्या आठवड्यात केली जाते. काही महिलांना धोका अधिक असल्यास ही चाचणी लवकर केली जाऊ शकते. जर गर्भधारणेच्या सुरुवातीलाच रक्तातील साखर जास्त आढळल्यास, ते गर्भधारणेतील मधुमेह नसून पूर्वीपासून असलेला टाईप 1 किंवा टाईप 2 मधुमेह असू शकतो.
गर्भधारणेतील मधुमेह झालेल्या महिलांनी टाईप 2 मधुमेह टाळण्यासाठी जीवनशैलीत आवश्यक बदल करणे महत्त्वाचे आहे. शरीराच्या एकूण वजनाच्या किमान 5% वजन कमी केल्यास जोखीम मोठ्या प्रमाणात कमी करता येते. संतुलित आहार, आठवड्यात किमान 150 मिनिटे व्यायाम, तसेच कुटुंब आणि वैद्यकीय तज्ज्ञांकडून मिळणारा भावनिक आधार या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. गरोदरपणात मधुमेह झालेल्या किंवा पूर्वीपासून मधुमेह असलेल्या महिलांसाठी मधुमेह प्रतिबंध कार्यक्रम फायदेशीर ठरू शकतो.
योग्य आहार, नियमित तपासणी आणि आरोग्यदायी जीवनशैली अवलंबल्यास मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे, गर्भधारणेदरम्यान आणि नंतरही महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
1. गर्भधारणेदरम्यान मधुमेह का होतो? (Why does diabetes occur during pregnancy?)
गर्भधारणेदरम्यान शरीरात हार्मोनल बदल होतात, जे इन्सुलिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात. त्यामुळे शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे कठीण होते आणि काही महिलांमध्ये गेस्टेशनल डायबेटिस होतो.
2. गर्भधारणेपूर्वी मधुमेह असल्यास काय काळजी घ्यावी? (What precautions should be taken if a woman has diabetes before pregnancy?)
गर्भधारणेपूर्वी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे, डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचारांमध्ये आवश्यक ते बदल करणे, तसेच आहार आणि व्यायामाचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे असते.
3. गर्भधारणेदरम्यान मधुमेह बाळावर काय परिणाम करू शकतो? (How can pregnancy-related diabetes affect the baby?)
अनियंत्रित मधुमेहामुळे बाळाला जन्मजात दोष, अधिक वजन, अकाली प्रसूती, मृत्यू किंवा नंतरच्या आयुष्यात लठ्ठपणा व टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
4. गर्भधारणेतील मधुमेह टाळण्यासाठी काय उपाय करता येतील? (What are the preventive measures for gestational diabetes?)
संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे (सप्ताहातून किमान 150 मिनिटे), वजन नियंत्रित ठेवणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळेवर तपासणी करणे हे उपाय उपयुक्त ठरतात.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.